Covishield sakal
पुणे

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण झाल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्येच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशील्डचे अतिरिक्त उत्पादन आणि पुरवठा थांबविला होता.

सम्राट कदम

पुणे - भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण झाल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्येच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशील्डचे अतिरिक्त उत्पादन आणि पुरवठा थांबविला होता. अॅस्ट्राझेनिका कंपनीने कोव्हिशील्डच्या जुन्या लसीचे अतिरिक्त डोस परत मागविल्यानंतर देशभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीरमने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सीरमच्या वतीने निवेदन प्रसिद्ध करत यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. त्यात ते म्हणतात, ‘लशीच्या पॅकिंगवर अगदी सुरवातीपासूनच अत्यंत दुर्मिळ असलेल्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली आहे. ज्यामध्ये थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमचाही उल्लेख आहे. वैश्विक कोरोना साथीतही लशीची सुरक्षितता सर्वतोपरी मानून पारदर्शकतेचे पालन करण्यात आले आहे. ॲस्ट्राझेनिका आणि सीरमच्या कोव्हिशील्ड लसीने साथीच्या काळात लोकांचे जीव वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.’

अफवांना बळी पडू नका...

अ‍ॅस्ट्राझेनिका कंपनीने कोव्हिशील्डच्या साईड इफेक्ट संदर्भात ब्रिटनच्या न्यायालयात माहिती दिली आहे. लशीच्या उत्पादनापासूनच थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम या अत्यंत दूर्मिळ दुष्परीणामाची सर्वांना कल्पना होती. लस घेतल्यानंतर महिन्याभराच्या आत याचे दुष्परिणाम दिसतात. भारतीयांनी लस घेऊन दोन वर्षे उलटले, त्यामुळे त्याचा सध्या तरी तिळमात्र संबंध भारतीयांशी नाही.

याच अ‍ॅस्ट्राझेनिका कंपनीने नुकतेच कोरोनाच्या जून्या व्हेरीएंटच्या अतिरिक्त लसी बाजारातून परत मागविल्या आहेत. त्याचाही भारताशी थेट संबंध नाही. देशातील निवडणूका आणि राजकीय आरोपांच्या फैरीत कोणत्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT