पुणे

सांगोला तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’चा उत्साहात शुभारंभ

CD

MHD26B05548

सांगोला : तालुक्यात सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून करताना सभापती पूनम इंगवले व इतर.

लोगो : सेवा संकल्प अभियान

७६ ग्रामपंचायतींमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन
सांगोला तालुक्यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी व रॅलीद्वारे जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. १७ : सेवा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाचा संदेश देणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ सांगोला तालुक्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगोला पंचायत समिती येथे सभापती पूनम इंगवले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सांगोला शहरातून बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कांबळे यांनी शिवणे ग्रामपंचायतीच्या आवारात वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी सरपंच दादासाहेब घाडगे, उपसरपंच छाया संभाजी घाडगे, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग एकतपुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कांबळे यांनी अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत सप्ताहनिहाय प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभाग वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
अभियानांतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी, स्वच्छता अभियान आणि जनजागृतीपर कार्यक्रमांसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

‘सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्वच्छ व सुंदर गाव निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे गटविकास अधिकारी श्री. कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT