पुणे

साबळे फार्मसी कॉलेज फार्मसीला ‘एमएसबीटीई’ची ‘उत्कृष्ट’ श्रेणी

CD

सासवड शहर, ता. १५ : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी आणि फार्मसी (पॉली) महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी ‘उत्कृष्ट’ श्रेणी देऊन गौरविले आहे.
संस्थेतील गुणवत्तापूर्ण अध्यापन, प्रभावी प्रशासकीय कार्यपद्धती, सुसज्ज पायाभूत सुविधा आणि सातत्यपूर्ण विद्यार्थी विकास उपक्रमांची ही फलश्रुती मानली जात आहे. या यशाबद्दल संस्थेवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशात संस्थेच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मानद सचिव ॲड. संदीप कदम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार आणि पॉलीच्या प्राचार्या विशाखा गायकवाड यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. भविष्यातही शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण व विशाखा गायकवाड यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer: थेट मंत्र्याशी नडणारा आयएएस अधिकारी! कोण आहेत जॉन किंग्जली? वाद थेट मुख्यमंत्री अन् मुख्य सचिवांपर्यंत

Success Story: भाड्याचे घर अन् 10 हजारांच्या पगारातून सुरुवात! मात्र आज तब्बल 400 कोटींच्या कंपनीचे मालक

Madhya Pradesh : लाडकी बहीण योजनेचा ३८ वा हप्ता जमा; १.२५ कोटी महिलांच्या खात्यात १८३५ कोटी रुपयांची थेट मदत

Latest Marathi News Update : उरुळी कांचन येथे २३० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Mumbai Railway NOC: रेल्वे ट्रॅकपासून ३० मीटरपर्यंत बांधकाम करायचंय? तर आधी रेल्वेकडून NOC घ्यावी लागणार, मुंबईत नवा नियम लागू

SCROLL FOR NEXT