पुणे

अखेर पाच दिवसानंतर सुरू झाला सेतूचा सर्व्हर विद्यार्थ्यांना दिलासा; विविध दाखले मिळण्यासह इतर कामकाज होते ठप्प

CD

अखेर पाच दिवसांनंतर ‘सेतू’चा सर्व्हर सुरू

ऐन शैक्षणिक प्रवेशाच्‍या धामधुमीत ठप्‍प होते कामकाज; दाखले काढण्‍यास वेग

दुधेबावी, ता. ८ : दहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे वेळेत काढू पाहणाऱ्या पालकांचा मोठा भ्रमनिरास झाला. सेतूचा सर्व्हर २८ एप्रिलपासून तीन मे रोजीच्‍या दुपारपर्यंत बंद पडल्याने सर्वच कामकाज ठप्प झाले होते. तब्बल पाच दिवस सेतूचा सर्व्हर ठप्‍प राहिला.
दरम्‍यान, महा ई सेवा केंद्र चालक, आपले सरकार केंद्र चालक यासह पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. येत्या काळात आता दाखले काढण्याच्या कामाला मोठा वेग येण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दहावी व बारावीचा निकाल लागणार असल्याचा अंदाज आल्यानंतर पालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली होती. रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला यासह इतर आवश्यक दाखले, प्रतिज्ञापत्र काढण्यासाठी पालक महा ई सेवा केंद्र व आपले सरकार केंद्रावर वारंवार हेलपाटे मारत होते.
..................................................
तब्‍बल दोन हजार दाखले प्रलंबित
सर्व्हर डाऊनचे कारण तब्बल पाच दिवस ऐकायला मिळत होते. फलटण तालुक्यात साधारणतः ५० आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्राचे कामकाज सर्व्हर डाऊनमुळे ठप्प झाल्याने फलटण तालुक्यात जवळपास दोन हजार दाखले प्रलंबित होते.
....................................................
प्रशासन फक्त बघतच राहिले
सेतूचा सर्व्हर डाऊन झाला, पाच दिवसांनी तो सुरूही झाला; पण प्रवेशापूर्वी दाखले काढण्यासाठी आलेल्या पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन फक्त बघ्याच्याच भूमिकेत होते. प्रशासनाकडून कोणतेही ठोस प्रयत्न न झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. बारावीपाठोपाठ दहावीचाही निकाल लागला असून, पुढील प्रवेशासाठी पालक व विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
............................................
सेतू सर्व्हर दुरुस्‍ती आणि अद्ययावतीकरणासाठी बंद होता. तो आता सुरू झाला असून, सर्व प्रलंबित दाखले प्रथम येणाऱ्यास प्रथम वितरण या पद्धतीने निर्गमित करण्यात येत आहेत. ३० एप्रिलपूर्वी कागदपत्रे पूर्तता केलेला एकही दाखला प्रलंबित नाही. सर्वांनी आपले विविध शैक्षणिक दाखले शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तत्काळ काढून घ्यावेत.
- डॉ. अभिजित जाधव,
तहसीलदार, फलटण
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT