kothrud3.jpg 
पुणे

पिरंगुटहून बीडला पायी निघाली गर्भवती अन्‌ मध्येच... 

सकाळवृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सध्या सगळीकडेच काम बंद असल्याने मजूर आपापल्या मूळगावी परत जात आहेत. असाच प्रकार मुळशीत घडला. मुळशी तालुक्‍यातील कासारअंबोली येथून एक गर्भवती महिला आणि 17 बीडला पायी निघाले होते. या मजुरांना तत्काळ सेवा फाउंडेशनने बसची सोय करून मदतीचा हात दिला. 

मुळशी तालुक्‍यातील कासारअंबोली येथून पायी बीडकडे निघालेल्या मजुरांना बावधन येथे सेवा फाउंडेशनच्या वतीने जेवणाची आणि इतर आवश्‍यक व्यवस्था करण्यात आली. या मजुरांशी चर्चा केली असता त्यांना लागलेली घराची ओढ आणि त्यात असलेले अडथळे पाहून कार्यकर्त्यांनी अवघ्या 24 तासात प्रवासाची तांत्रिक परवानगी मिळवली आणि त्यांना एका खासगी बसचे नियोजन करून रवाना केले. 

यावेळी तलाठी सागर शेलार, गोरख दगडे, उमेश दगडे, रामदास दगडे, अमोल दगडे, नागेश भुंडे, राजू भुंडे, शंकर तोडकर, मंदार जोशी, सारिका भुंडे, सीमा भालेराव आदी उपस्थित होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पायी जाण्याची मानसिकता केलेल्या मजुरांना बसची व्यवस्था केल्याचे समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आम्हालाही आनंद देऊन गेले. अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; 3 जून रोजी शपथविधी, नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT