vignharta vadya pathak.jpg
vignharta vadya pathak.jpg 
पुणे

'सेवा मित्र मंडळ' कृत विघ्नहर्ता वाद्य पथक : वादनाबरोबरच समाजसेवेचाही वसा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'सेवा मित्र मंडळ' कृत 'विघ्नहर्ता वाद्य पथक' यंदाच्या वर्षी ५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपल्या मंडळाचे ढोल ताशा पथक हे मागील ४ वर्षात जवळपास ९० वादने केली आहेत. या मध्ये श्री गणेश आगमन, विर्सजन, स्थिर वादने, समाजपयोगी कार्यासाठी व महिंलासाठी वादने केली आहेत.

पथकाने उत्कृष्ट वादना बरोबर सामाजिक बांधिलकी जपत पहिल्या वर्षी नवरात्र उत्सवात 'धान्यरुपी जोगवा' सेवा मित्र मंडळ, खडक पोलीस स्टेशन व ७ नवरात्र मंडळा सोबत घेऊन हा विशेष उपक्रम राबवला. यामध्ये ९००० किलो धान्य दुष्काळग्रस्त भागात देण्यात आले. तसेच हा उपक्रम ३ वर्षे श्री महालक्ष्मी मंदीर, सारसबाग येथे वादन करुन अनाथाश्रम (रु. ६०,०००/-) व कालवाफुटीग्रस्त (रु. ५५,०००)११ कुटुंबियांना प्रत्येकी  १ महिन्याचा शिधारुपी धान्य देण्यात आले. याचबरोबर पोतराज वस्तीमध्ये सोलर लाईट बसवून त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. चाॅकलेट दहिहंडी, विशेष मुलांसाठी वादन, महिलांसाठी श्रावणसोहळा वादन, तृतीयपंथीयां साठी माॅलमध्ये प्रवेश  मिळाल्यावर केलेले स्वागतपर वादन, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीस बाधंवाना रक्षाबंधन असे विविध उपक्रम राबवले. 

सेवा परमो धर्मः हे ब्रीद असेलेल्या सेवा मित्र मंडळाचा वारसा जपून तो आणखी वाढवण्याचा हे पथक प्रयत्न करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT