road.jpg 
पुणे

काय सांगता ! दोन वर्षात अवघ्या सातशे मीटर रस्त्याचे काम... 

निलेश बोरुडे

किरकटवाडी (पुणे) : सुमारे दोन वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या सिंहगड रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटादरम्यान रस्त्याचा अर्धा भाग खोदलेल्या ठिकाणी डोक्‍यापर्यंत उंचीचे गवत उगवले आहे. सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे दोन वर्षांत केवळ सुमारे 700 मीटर काम झाले असून त्या कामाचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. कामाला विलंब लावणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. 

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट व विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्यासह शेकडो लोकांच्या उपस्थितीत सिंहगड रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. येत्या 12 सप्टेंबर रोजी रस्त्याच्या कामाच्या उद्‌घाटनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये संबंधित ठेकेदाराने किरकटवाडी फाट्यावरील पूल ते खडकवासला गावाच्या हद्दीतील मुकाई मंदिरापर्यंत केवळ 700 मीटर काम पूर्ण केले आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून काम अर्धवट ठेवले आहे. या तयार केलेल्या रस्त्याच्या कडेने कुठलीही ड्रेनेज व्यवस्था नसल्याने पाऊस सुरू असताना कोल्हेवाडी फाट्या दरम्यान सिंहगड रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधून रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी विनंती करत आहोत. मागे काही महिने लॉकडाउनचे कारण सांगितले जात होते. आता पावसाचे कारण सांगून कामाला टाळाटाळ केली जात आहे. 
- नरेंद्र हगवणे, ग्रा.पं. सदस्य किरकटवाडी. 

नागरिकांना त्रास होत असताना लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. उद्‌घाटनासाठी जशी लोकांची गर्दी जमवली होती, तशी गर्दी रस्ता खराब झाला म्हणून लोकप्रतिनिधी का जमवत नाहीत. लोकप्रतिनिधींकडून केवळ दिखाऊपणा सुरू आहे. 
- शैलेश मते, रहिवासी, कोल्हेवाडी. 

 

ठेकेदाराशी वेळोवेळी काम सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. काही अंतरासाठी वनविभागाची परवानगी बाकी असल्याचे कारण ठेकेदाराकडून सांगितले जात आहे. वनविभागाकडून लवकर परवानगी मिळाली नाही तर इतर ठिकाणी काम केलेले बिलही अडकून राहील असे म्हणून ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करत आहे. 
- वैशाली भुजबळ, अतिरिक्त अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

Marathi News Live Updates : एनडीए "१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 'सेवा संकल्प' अभियान' राबवणार : अमित शहा

SCROLL FOR NEXT