मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात शनिवारी (ता. २५) कोरोनाचे नवीन ७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २२५ झाली आहे. १०३ जणांचे नमुने घेतले असून, त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. लॉकडाउनसह अनेक उपाययोजना केल्या, पण कोरोना संसर्गाचे महाभयंकर संकट थांबता थांबेना. हे संकट कसे रोखावे, या काळजीत प्रशासन व १०४ गावातील गावकरी आहेत.
आज महाळुंगे पडवळ, मंचर, पाटण येथे प्रत्येकी एक व कळंब येथे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तब्बल ३४ गावांमध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. त्यामध्ये मंचर, वडगाव काशिंबेग, घोडेगाव, पारगावतर्फे अवसरी बुद्रक, महाळुंगे पडवळ, अवसरी खुर्द, पेठ, कळंब, रांजणी या मोठ्या लोकसंख्या असलेल्या गावतही संसर्ग झाला आहे. तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १२० आहे, बरे होऊन घरी सोडलेल्यांची संख्या १०१ आहे.
मंचर शहरात तर कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. ७३ पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. त्यापैकी ४८ जणांवर मंचर उपजिल्हा रुग्णालय, भीमाशंकर हॉस्पिटल, अवसरी खुर्द शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय येथे उपचार सुरु आहेत. बरे झालेल्या २३ जणांना घरी सोडले आहे. दोन मयत झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर महाळुंगे पडवळ (१९ एकूण रुग्ण) व तिसऱ्या क्रमांकार घोडेगाव (१६ एकूण रुग्ण) आहे. आदिवासी दुर्गम भागातील पाटण फुलवडे गावातही कोरोनाने प्रवेश केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.