Corona Patient Sakal
पुणे

दिलासादायक! तब्बल सत्तर दिवसानंतर पुण्यातील रुग्ण एक हजाराच्या आत

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दररोज शहर व जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या (Corona) बाबतीत पुणेकरांना (Pune) दिलासा देणारी बातमी सोमवारी (ता.१७) घडली आहे. सत्तर दिवसांच्या म्हणजेच सुमारे अडीच महिन्यांच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची (New Corona Patient) संख्या ही एक हजारांच्या आत आली आहे. शहरात आज केवळ ६८४ नवे रुग्ण सापडले आहेत. याउलट तब्बल २ हजार ७९० जण कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. कोरोनामुक्तांची ही संख्या नवीन रुग्णांच्या तुलनेत चौपटीहून अधिक आहे. या आकडेवारीवरून पुणे शहरात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Seventy days later within a thousand patients Less in Pune)

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दररोज शहर व जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालानुसार याआधी सत्तर दिवसांपूर्वी म्हणजेच ८ मार्चला शहरात ७५३ नवे रुग्ण सापडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९ मार्चला दिवसभरातील रुग्णाचा हा आकडा १ हजार ८६ झाला होता. तेव्हापासून रविवारपर्यंत (ता.१६ मे) सातत्याने हा आकडा वाढत गेला होता. या आकड्याने वाढत वाढत एका दिवशी सात हजारांचा टप्पा ओलांडला होता.

शहरातील सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांचा आकडाही २० हजारांच्या आत आला आहे. हा आकडा ५२ हजारांवर पोचला होता. सद्यःस्थितीत शहरात १८ हजार ४४० सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ७ हजार ७६८ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य १० हजार ६७२ गृह विलगीकरणात आहेत.

दरम्यान, शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवड, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील नवीन रुग्णांची संख्याही आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये ८४६, जिल्हा परिषद कार्यंक्षेत्रात १ हजार ४८५, नगरपालिका हद्दीत १८८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात केवळ २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण पुणे जिल्ह्यात ३ हजार २०८ नवे रुग्ण सापडले असून याउलट ९ हजार ८३८ कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य १०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ४३ मृत्यू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT