पुणे

सेक्सटॉर्शन अन्‌ ऑनलाइन ब्लॅकमेल फसवणूक

CD

सेक्सटॉर्शन अन् ऑनलाइन ब्लॅकमेलिंगला फसू नका
सायबर पोलिसांचे आवाहन; फसवणूक झाल्यास १९३० क्रमांकावर करा तक्रार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : सेक्सटॉर्शन म्हणजे सायबर गुन्हेगार खोट्या ओळखीने मैत्री करून किंवा लैंगिक स्वरूपाच्या गप्पांच्या आमिषाने खासगी फोटो किंवा व्हिडिओ घेतात. ते लीक करण्याची धमकी देऊन सायबर गुन्हेगार पैशांची मागणी करतात. सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगार समोरच्याला आमिष दाखवतात, त्यावेळी आपण खूप लवकर मैत्री किंवा प्रेमाची कबुली देतो. इंटिमेट फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी दबाव टाकला जातो, व्हिडिओ कॉलवर कपडे काढण्यास सांगितले जाते. त्यानंतर कॉल रेकॉर्ड होत असल्याची शंका किंवा अनोळखी ॲपवरून लिंकवर जाण्यास सांगितले जाते. धमकी देणे (पैसे पाठव, नाहीतर व्हिडिओ लीक करतो), यूपीआय, गिफ्ट कार्ड किंवा क्रिप्टो वॉलेटवर पैसे मागणे, असे प्रकार सायबर गुन्हेगार करतात. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. फसवणूक झाल्यास घाबरू नका, पैसे देऊ नका, पुरावे जतन करून ठेवा आणि तत्काळ १९३० या क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावर तक्रार करा, असा सल्लाही पोलिसांनी दिला.

फसवणूक कशी होते?
- खोटी प्रोफाइल तयार करून सोशल मीडिया, डेटिंग ॲप किंवा मेसेजिंग ॲपवर संपर्क.
- मैत्री, विश्वास संपादन आणि इंटिमेट चॅट किंवा व्हिडिओ कॉल.
- तुमचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जातो किंवा चॅटमधील फोटो, व्हिडिओ साठवले जातात.
- हे फोटो किंवा व्हिडिओ कुटुंबीयांना, मित्रांना पाठविण्याची किंवा सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते.
- घाबरून पैसे, गिफ्ट कार्ड, क्रिप्टो किंवा इतर माध्यमातून पैशांची मागणी केली जाते.

स्वतःचे संरक्षण कसे कराल?
- अनोळखी व्यक्तींशी मैत्री करताना सावध राहा.
- इंटिमेट फोटो किंवा व्हिडिओ कसेही शेअर करू नका.
- व्हिडिओ कॉलवर स्वतःचे खासगी दृश्य दाखवू नका.
- तुमची प्रोफाइल, फोटो आणि वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा.
- गोपनीयता सेटिंग्ज मजबूत ठेवा, पासवर्ड सुरक्षित ठेवा.
- डिजिटल साक्षर व्हा, सावध राहा, इतरांनाही जागरूक करा.

कोट :
सायबर गुन्हेगाराने आपल्याला फसविल्यास घाबरू नका, शांत राहा. पैसे देऊ नका, एकदा दिले की धमक्या वाढतात. अशावेळी चॅट, स्क्रीनशॉट, प्रोफाइल, पेमेंटची माहिती यासारखे सर्व पुरावे जतन करा. त्या व्यक्तीला त्वरित ब्लॉक करा आणि पोलिसांना रिपोर्ट करा किंवा तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
- भालचंद्र ढवळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT