पुणे

शाहूपूरी चौक रुंदीकरण करणार

CD

लोगो - सकाळ इम्पॅक्ट

शाहूपुरी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पाहणी

चौकातील अतिक्रमण काढण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सूचना

सातारा, ता. २५-ः शाहूपुरी चौकातील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तातडीने हाती घ्या, तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमण काढा, अशी सूचना आज नियोजन समितीचे सभापती अशोक शेडगे यांनी पालिका प्रशासनास दिली. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाहूपुरी चौकातील सर्व अतिक्रमित टपरीधारक, हॉटेलधारक तसेच व्यवसाय थाटलेल्यांना अतिक्रमण काढण्याची सूचना करून कारवाईचा इशारा दिला. दरम्यान शाहूपुरी चौकातील अतिक्रमणांमुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीस सातत्याने सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पदाधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणाच्या कार्यवाहीस लवकरच प्रारंभ होईल, अशी ग्वाही आज दिली.

अदालतवाडा ते बोगदा या रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेने या मार्गावरील अतिक्रमित, धोकादायक, बाधित मिळकतींवर कारवाई केली. आता शाहूपुरी चौकात होणारी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी नियोजन विभाग सरसावले आहे. आज मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांसह तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी शाहूपुरी चौकाची पाहणी केली. यावेळी नगरसेवक अक्षय जाधव, विश्वतेज बालगुडे उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याची मोजणी, अतिक्रमित भाग, बाधित भाग याचे सर्वेक्षण करण्यास सांगितले. यावेळी नगरसेवक जाधव, बालुगडे यांनी देखील मुख्याधिकाऱ्यांना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, अशी सूचना केली.

कोट

आंबेदरे, दिव्यनगरीसह मेढा रस्त्याकडे जाण्यासाठी शाहूपुरी चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. अतिक्रमणधारकांमुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. हा रस्ता अतिक्रमणमुक्त करा, अशी मागणी शाहूपुरीवासीयांनी केली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे.
- अशोक शेडगे, सभापती, शहर विकास नियोजन विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

Marathi News Live Updates : नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन घेणाऱ्या 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून ३२ विद्यार्थ्यांना विषबाधेची शक्यता; २७ मुले, ५ मुलीं उपजिल्हा रुग्णालयात दाखल

Tukaram Mundhe: ५१व्या वर्षीही हेल्दी अन् फिट राहण्यासाठी तुकाराम मुंढे फॉलो करतात 'हे' तीन नियम

SCROLL FOR NEXT