पुणे

शाहूपुरीचा पाणीपुरवठा सुरळीत

CD

शाहूपुरीचा पाणीपुरवठा सुरळीत

कण्‍हेर पाणी उपसा योजनेचा वीजपुरवठा अखेर पूर्ववत

सातारा, ता. २८ : कण्‍हेर पाणी उपसा योजनेचा विद्युतपुरवठा सुरळीत झाल्‍याने शुक्रवारी शाहूपुरीसह परिसरातील पाणीपुरवठा प्राधिकरणास पूर्ण क्षमतेने करणे शक्‍य झाले. गुरुवारी अचानक पाणीपुरवठा बंद झाल्‍याने शाहूपुरीसह परिसरातील नागरिकांची मोठी दैना उडाली होती.
शाहूपुरीसह परिसराला कण्‍हेर धरणावरील आधारित उपसा योजनेतून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. यासाठीची स्‍वतंत्र विद्युत वाहिनी असून, त्‍यामध्‍ये गुरुवारी बिघाड झाला होता. झालेला बिघाड दूर करण्‍यासाठी वीज वितरण कंपनी सकाळपासूनच सक्रिय झाली होती. विद्युतपुरवठा बंद झाल्‍याने कण्‍हेर येथून पाण्‍याचा उपसा न झाल्‍याने गुरुवारी शाहूपुरीसह परिसरातील पाणीपुरवठा ठप्‍प झाला होता. अचानक पाणीपुरवठा बंद झाल्‍याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दिवसभर वीज वितरण कंपनीने केलेल्‍या कामानंतर उपसा केंद्राचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. यानंतर पाणी उपसा सुरू करण्‍यात आला. गुरुवारी सायंकाळनंतर पूर्ण क्षमतेने उपसा करत शाहूपुरीसह परिसरातील साठवण आणि वितरण टाक्‍या पाण्‍याने भरण्‍यात आल्‍या. यानंतर शुक्रवारी सकाळी पूर्ण क्षमतेने संपूर्ण परिसराला नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्‍यात आला. कण्‍हेर उपसा केंद्राला वीज पुरवणाऱ्या वाहिनीत विविध कारणांमुळे वारंवार बिघाड होत आहे. त्‍यासाठी पर्यायी वीज वाहिनीची व्‍यवस्‍था करण्‍याची मागणी यापूर्वी अनेकदा करण्‍यात आली आहे. मागणी करूनही त्‍याबाबतची कार्यवाही होत नसल्‍याने शाहूपुरीवासीयांना अचानक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

............................................

Mumbai Local: दरवाजात उभं राहण्यावरुन वाद, रागात तरुणाला धावत्या लोकलमधून खाली ढकललं; बोरीवली स्थानकात थरार

नेपाळमध्ये पूरस्थिती गंभीर; भारतीयांसाठी 24×7 हेल्पलाइन जारी, हे नंबर सेव्ह करा!

True Friendship: संकटात रक्ताची नाती दुरावली, पण मित्र धावून आले; सचिनच्या कुटुंबासाठी जमवले ६ लाख ७२ हजार, रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी मैत्री

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विविध शाळा आणि संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

SCROLL FOR NEXT