पुणे

शहजाद भट्टी नेटवर्क आता दहशतवादी संघटना

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ : केंद्र सरकारने पाकिस्तानातील शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. हा गट विविध आमिषे दाखवून तरुणांना कट्टरतावादी बनविण्यात, देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्यात गुंतला असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील विविध दहशतवादी कृत्यांमध्ये शहजाद भट्टी नेटवर्कचा सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टद्वारे या निर्णयाची औपचारिक माहिती दिली. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरोधातील शून्य सहनशीलतेच्या दृष्टिकोनाचा पाठपुरावा करताना गृह मंत्रालयाने शहजाद भट्टी नेटवर्कला ‘यूएपीए’अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा गट सीमापार शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील आहे. तसेच, तरुण आणि किरकोळ गुन्हेगारांना दहशतवादासाठी या संघटनेकडून चिथावणी दिली जाते. भारताच्या लोकशाही रचनेला आणि जातीय सलोख्याच्या धाग्याला लक्ष्य करून, या सिंडिकेटने द्वेषपूर्ण डिजिटल मजकूर देखील प्रकाशित केला आहे,’’ असे शहा यांनी म्हटले आहे.

निर्णयाचा परिणाम
शहजाद भट्टी नेटवर्कला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केल्याने तपास यंत्रणांना या नेटवर्कसाठी काम करणाऱ्या करणाऱ्यांवर दहशतवादी वित्तपुरवठा, सदस्यत्व व कट रचणे यांसारखे आरोप लावण्याचा अधिकार मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी, सुरक्षा यंत्रणांनी शहजाद भट्टी नेटवर्कवर देशव्यापी कारवाई करताना १४ राज्यांमधून २५३ जणांना ताब्यात घेतले होते. तसेच स्फोटके, शस्त्रसाठा व पाळत ठेवण्याची उपकरणे जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये कथितरित्या आयईडी, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीची खूण असलेले बाँब, पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि हेरगिरीसाठी वापरले गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश असून, यातून थेट सीमापार संबंध असल्याचे दिसून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT