Kasba Bypoll Election 
पुणे

Kasba Bypoll Election : "मुक्ताताई असत्या तर..." ; मतदान केल्यानंतर शैलेश टिळक भावूक

सकाळ डिजिटल टीम

Kasba Bypoll Election : महाराष्ट्राच्या राजकारणात कसबा पोटनिवणूक चांगलीच चर्चेत आली. या निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करताना भाजपमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळाले. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. ही उमेदावरी टिळक कुटुंबात मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शैलेश टिळक नाराज असल्याची चर्चा होती. मात्र भाजप नेत्यांनी त्यांची नाराजी दुर केली. 

दरम्यान, टिळक कुटुंबीयांनी मतदान केले. शैलेश टिळक, कुणाल टिळक यासह घरातील इतर जणांनी आज कसबा पोटनिवडणुकीचा हक्क बजावला. 

दरवर्षी मतदान करत होतो, या वर्षीही केले आहे. पण दरवर्षी मुक्ता बरोबर यायची निवडणुकीला आज ती उणीव भासत आहे अशी भावना व्यक्त करताना शैलेश टिळक भावूक झाले. मला खात्री आहे की भाजप कसबा पोटनिवडणूक नक्की जिंकेल, असा विश्वास शैलेश टिळक यांनी व्यक्त केला. 

शैलेश टिळक म्हणाले, मुक्ता असत्या तर निवडणूक झालीचं नसती. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. मला शंभर टक्के खात्री आहे की भाजपचा मोठा विजय होणार आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. त्या सत्ता बदलानंतर ही होणारी पहिली पोटनिवडणूक होती. काही दिवसांवर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची असल्याचे टिळक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Video: फडणवीसांच्या नात्यातील महिला जरांगेंकडे! धनंजय मुंडेंनी त्रास दिल्याचा आरोप

ऑस्ट्रेलियाचा गेम झाला, शेवटच्या सामन्याआधीच T20 World Cup मधून बाहेर; Super-8 मधील ७ संघ ठरले, आता एका जागेसाठी कोण शर्यतीत?

Latest Marathi News Live Update : भाईंदरात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार, मनसेचा आक्रमक पवित्र्याने आरोपीला अटक

पडद्यावर रोमॅंटिक हिरो पण खऱ्या आयुष्यात पत्नीला अशी वागणूक द्यायचा मिथुन चक्रवर्ती; इतक्या सुंदर बायकोला त्याने...

Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

SCROLL FOR NEXT