पुणे

‘वेहेरगाव क्रिकेटरत्न’ पुरस्काराने शैलेश वहिले यांचा गौरव

CD

​लोणावळा, ता. २४ : ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणारे आणि स्वतः राष्ट्रीय स्तरावर चमकलेले राष्ट्रीय क्रिकेटपटू शैलेश वहिले यांना ‘वेहेरगाव क्रिकेटरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अष्टविनायक ग्रुप, वेहेरगाव ग्रामस्थ आणि क्रिकेटप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वेहेरगाव प्रीमियर लीग’च्या बक्षीस वितरण सोहळ्यात वहिले यांचा गौरव करण्यात आला. या वेळी संजय देवकर, कैलास पडवळ, बबन माने, मंगेश देशमुख, अनिल गायकवाड, चंद्रकांत देवकर, संतोष देवकर, शंकर बोरकर, संदीप देवकर, सुनील गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
​मावळ तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावणाऱ्या शैलेश वहिले यांनी आयपीएलदरम्यान सौरव गांगुली, स्टीव्ह स्मिथ, आशिष नेहरा, रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत सराव केला आहे. तसेच त्यांना दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध खेळण्याचा आंतरराष्ट्रीय अनुभवही गाठीशी आहे. ​केवळ स्वतः खेळण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी प्रशांत वहिले क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक तरुणांना राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून दिली आहे. या कार्याची दखल घेत यापूर्वी औरंगाबाद येथे वहिले यांना ‘राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज समाजभूषण’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. गणेश पवार, पांडुरंग बोत्रे, विशाल माने, तानाजी कुटे, रंगनाथ पडवळ, संदीप देशमुख यांनी संयोजन केले. अशोक कुटे यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ बोत्रे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT