पुणे

शक्तिपीठ महामार्गापेक्षा आधी रस्ते दुरुस्त करा

CD

बारामती, ता. १८ : शक्तिपीठ महामार्गाला राज्यभरातून प्रचंड विरोध आहे. हा महामार्ग उभारताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करणे आवश्यक आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शक्तिपीठ महामार्गावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा राज्यातील अस्तित्वात असलेले रस्ते प्रथम दुरुस्त करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामतीत त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘मुंबईत ठेकेदारांचे सुरू असलेले आंदोलन गंभीर आहे. एकीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केली जात असताना ज्यांनी कामे पूर्ण केली आहेत, अशा ठेकेदारांना त्यांच्या कामाचा निधी दिला जात नाही. त्यांच्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारचे आर्थिक धोरण नेमके कोणत्या दिशेने चालले आहे, हा चिंतेचा विषय आहे.’’
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनानंतर शाळांमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव करणारा शासन निर्णय काढण्यात आला असल्यास त्याचा आपण जाहीर निषेध करतो, असेही सुळे म्हणाल्या. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. त्या म्हणाल्या ‘‘आमची चर्चा बारा वर्षे चालते. त्यामुळे बारा वर्षे आम्ही जाणार असल्याचे तुम्ही दाखवता. आणखी तीन वर्षे चर्चा चालू दे. आमचा पक्ष सध्या विरोधी पक्षात असून, गेल्या बारा वर्षांपासून विरोधी पक्षात राहून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण निष्ठेने काम करत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : बीड जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार! ​सिझेरियन करताना पोटातच सोडले ग्लोज; आतडे सडले अन् गर्भाशय काढावे लागले; १९ वर्षीय माता मरणाच्या दारात

Degloor Crime : अंध विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी ॲट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा

YouTube वर आता Views चा खेळ बदलणार! २४ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, नेमका काय झालाय बदल?

Mumbai Local : रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा! लोकलच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात ओएचईचा धक्का, घाटकोपरमध्ये लोकल १९ मिनिटे खोळंबली

Marathi News Live : क्रिकेट बुकीच्या प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT