पुणे

स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा शेळगांवात भव्य सत्कार सोहळा संपन्न!

CD

VRG26B06103
शेळगाव (ता. बार्शी) : येथे सत्कारानंतर डॉ. ऋचा गोडगे हिच्यासह विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत.
--
स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा
शेळगावात सत्कार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. ५ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत ८४ व्या क्रमांकासह उत्तीर्ण झालेल्या बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील डॉ. ऋचा गोडगे हिच्यासह विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गावातील ३८ गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा रविवारी (ता. ४) सायंकाळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, वैराग पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव आणि सोलापूर रोटरी क्लबचे नवनिर्वाचित संचालक तथा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य संयुक्त सचिव विलास कोले यांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. व्यासपीठावर पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, माजी उपशिक्षणाधिकारी दादाराव सावंत, संस्थापक लक्ष्मणराव गायकवाड, बार्शी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व माजी सरपंच वासुदेव गायकवाड, बार्शी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती व शिक्षण प्रसारक मंडळाचे बाबा गायकवाड, सरपंच प्रकाश बादगुडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बार्शी तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि गावचे पोलिस पाटील ज्ञानदेव नागणे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे बारामती झोनल सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते विजय अडसूळ, भाई विलास उबाळे, कैलास साळुंखे आणि समस्त शेळगाव ग्रामस्थांनी केले होते. यावेळी ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर पुण्याचे व्याख्याते अशोक देशमुख यांचे व्याख्यान आयोजित केले होते. भागवत ताकभाते यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस पाटील ज्ञानदेव नागणे यांनी प्रास्ताविक केले. विलास उबाळे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त शेळगाव ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT