पुणे

छत्रपती संभाजीराजे जंयती विशेष स्टोरी

CD

PNE26W18829 - सोलापूर : सेल्फीसाठी हात सरसावणाऱ्यांच्या गर्दीत, अनाम राहून शंभूराजेंची मूर्ती गावागावात आणि घराघरांत पोहोचवत असलेले छात्रवीर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते.
PNE26W18827 - सोलापूर : ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणारी शंभूराजेंची छोटी मूर्ती.

शंभूराजेंना प्रत्येक गाव, घरात पोचविण्याचा ध्यास
सोलापूरच्या छात्रवीर प्रतिष्ठानचा शांत; पण मनाला भिडणारा उपक्रम

प्रभुलिंग वारशेट्टी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : आजकाल कोणताही सामाजिक उपक्रम म्हटला की आधी बॅनर, मग फोटोशूट आणि शेवटी सोशल मीडियावर पोस्ट, असे चित्र दिसते. सोलापूरातील काही तरुणांनी अशाच प्रकारची शांत; पण प्रभावी चळवळ उभी केली आहे. ना गाजावाजा, ना सेल्फी, ना प्रसिद्धीची धडपड... तरीही त्यांच्या उपक्रमाची चर्चा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात सुरू आहे. कारण त्यांचा एकच ध्यास आहे, ‘शंभूराजे प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात पोचले पाहिजेत!’

याच विचारातून ‘छात्रवीर प्रतिष्ठान’ने गेल्या चार वर्षांत तब्बल ८४ भव्य मूर्ती विविध गावांना भेट दिल्या आहेत. साडेपाच फूट उंचीच्या या मूर्ती गावोगावी इतिहासाची आठवण जागी करत आहेत. मोठ्या मूर्तींपासून सुरू झालेला हा प्रवास यंदा थेट घराघरांत पोचला आहे. गावागावात, घराघरांत, मनामनांत शंभूराजे या संकल्पनेतून प्रतिष्ठानने लिक्विड मार्बल फायबरच्या आकर्षक मूर्ती अवघ्या ७०० रुपयांत उपलब्ध करून दिल्या आहेत. या मूर्ती ना नफा, ना तोटा तत्त्वावर दिल्या जात आहेत.
या तरुणांनी ‘मूर्ती’ घरापर्यंत आणून दिली आहे; आता त्या मूर्तीतील ‘विचार’ आचरणात आणण्याची जबाबदारी समाजाची असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
यंदाच्याच वर्षी २१ मोठ्या मूर्ती सोलापूर, धाराशिव, बीड, बार्शी, गुलबर्गा आदी भागांत पोचल्या आहेत. धाराशिवमधून तब्बल ६० मूर्तींची मागणी आली. मोहोळमधील एका मंडळाने रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना भेट देण्यासाठी ३० मूर्ती घेतल्या. अकोलेकाटी आणि तामलवाडी येथे मूर्ती दिल्यानंतर शंभूराजे जयंती साजरी करण्यास सुरुवात झाल्याचेही सांगण्यात आले.
----------------------------
जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर
या उपक्रमाचे विशेष म्हणजे मूर्ती देतानाही प्रसिद्धीपासून जाणीवपूर्वक ठेवलेले अंतर. मूर्ती तयार झाल्यानंतर ती थेट मूर्तीकाराकडून संबंधित मंडळाच्या वाहनात चढवली जाते. ना स्वागत, ना हारतुरे, ना फोटोसेशन. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मुद्दाम त्या क्षणी बाजूलाच राहतात. “महाराजांचा विचार त्या मूर्तीसोबत गावात पोचला पाहिजे; आमचा फोटो पेपरात नाही,” ही त्यामागची भूमिका आहे.
----------------------------
शांत चळवळीतून ८०० मूर्तींचे वाटप
काही गावांत यंदा प्रथमच चौकात ‘शंभूराजे’ उभे राहिले आहेत. त्यामागे कुठलाही राजकीय गाजावाजा नसून, इतिहासावर प्रेम करणाऱ्या काही तरुणांची शांत चळवळ आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांनाही शंभूराजेंची मूर्ती भेट दिली जाते. आजवर ८०० हून अधिक मूर्तींचे वाटप करण्यात आले आहे.
-----------------------------
कोट : PNE26W18830
इतिहास फक्त भाषणातून जिवंत राहत नाही; तो संस्कारातून जिवंत राहतो. हा उपक्रम आता केवळ मूर्ती वाटपापुरता राहिलेला नाही, तर ‘शंभूराजेंना मनामनांत पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न’ आहे. म्हणूनच प्रत्येक वर्षी शंभूराजे जयंतीदिनी पहिली पूजा महिलांच्या हस्ते केली जाते.
- शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष, छात्रवीर प्रतिष्ठान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

LPG Supply India : LPG बाबत दोन आनंदाच्या बातम्या! 'हॉर्मुझ'मधून 34 लाख सिलिंडर्सचा साठा भारताकडे रवाना; गॅस सिलिंडर दरवाढीतही मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर

Petrol-Diesel Rate: RBI गव्हर्नरांच्या इशाऱ्यानंतर नवे दर जाहीर; पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT