Shaniwar Wada  sakal
पुणे

Shaniwar Wada : शनिवारवाड्याला मिळणार गतवैभव;खासदार मेधा कुलकर्णी पाठविणार पुरातत्त्व विभागाला प्रस्ताव

एकेकाळी अवघ्या देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या व कालौघात दुर्लक्ष होत असलेला शनिवारवाडा आता कात टाकणार आहे. शनिवारवाड्याच्या डागडुजीपासून ते गतवैभव अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एकेकाळी अवघ्या देशाचा केंद्रबिंदू असणाऱ्या व कालौघात दुर्लक्ष होत असलेला शनिवारवाडा आता कात टाकणार आहे. शनिवारवाड्याच्या डागडुजीपासून ते गतवैभव अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. १५) शनिवारवाड्याची पाहणी केली. त्याबाबतचा प्रस्ताव पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाला सादर करणार आहेत.

कुलकर्णी यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता शनिवारवाड्याची पाहणी केली. यावेळी भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव व ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक मोहन शेट्ये, मंदार लवाटे, लेखक व इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, निनाद पटवर्धन, रश्‍मीन कुलकर्णी, भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षक सहाय्यक गजानन मंडावरे, ओंकार गरुड, वास्तुविशारद प्रचित कलमदाणी आदी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘शनिवारवाड्याची डागडुजी करण्यापासून ते दुर्मिळ चित्र, त्यावेळेचे वृक्ष, फुलझाडे पुन्हा कसे लावता येतील, होलोग्रामद्वारे शनिवारवाड्याचे दृकश्राव्य चित्र दाखविणे यांसारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुरेसा निधी, विविध परवानग्यांची गरज आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुरातत्त्व विभाग व सांस्कृतिक विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.’’ दरम्यान शनिवारवाड्यात साचलेला कचरा, प्लॅस्टिक बाटल्यांचा वापराबाबत कुलकर्णी यांनी प्रशासनाला खडसावून तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT