पुणे

जगण्याने छळले, अंत्यविधीसाठीही आबाळ

CD

तळेगाव दाभाडे, ता. ११ : नातेवाईक सोडाच, पण स्वतःचे नाव सिद्ध करण्यासाठी लागणारा एकही कागद नसलेल्या निराधार व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (ता. ८) रात्री प्रभाग क्रमांक १३ मध्ये आढळला. गेल्या १५ वर्षांपासून शहराच्या कोपऱ्यात ‘शंकर’ एवढीच ओळख घेऊन वावरणाऱ्या या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण, ओळखपत्र नसल्याने त्याच्या अंत्यविधीसाठी तब्बल २० तासांचा संघर्ष करावा लागला.

अनेकांच्या परिचयाच्या ‘शंकर’चा मृतदेह आढळल्याचे समजताख नगरसेविका शोभा सुनील परदेशी यांनी धाव घेतली. त्यांनी पोलिस आणि नगरपरिषद प्रशासनाला बोलावले. मात्र, खरी अडचण पुढेच होती. मृत व्यक्तीकडे आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा कोणतेही कायदेशीर ओळखपत्र नव्हते. अशा स्थितीत मृतदेहाचा ताबा आणि अंत्यविधी प्रशासकीय नियमांच्या कचाट्यात अडकला. दिवसभर पाठपुरावा आणि कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तब्बल २० तासांनी बनेश्वर स्मशानभूमीत शंकरच्या देहावर अंत्यविधी करण्यात आला. या प्रक्रियेत पोलिस, नगरपरिषद आणि मावळ तालुका वन्यजीव रक्षक संघटनेचे अध्यक्ष नीलेश गराडे, राजू सय्यद, वीरा ॲम्बुलन्सचे सुशांत परदेशी, ज्योती सूर्यवंशी, अमित खंडागळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही गोष्ट केवळ एका शंकरची नाही. तळेगाव आणि परिसरात असे अनेक निराधार आहेत, ज्यांच्याकडे स्वतःची ओळख पटवणारे कोणतेही साधन नाही. अनेकदा हे लोक आजारपणात उपचारांविना जीव सोडतात. मृत्यूनंतर त्यांच्या वारसांचा पत्ता नसतो, अशा वेळी प्रशासकीय यंत्रणाही हतबल ठरते.
परदेशी यांनी या संदर्भात भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या, ‘‘शहरात अनेक बेघर व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या आरोग्याची आणि राहण्याची सोय व्हावी, यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या अंत्यविधीला कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी नगरपरिषदेने स्वतंत्र निधीची तरतूद करावी आणि एक कायमस्वरुपी व्यवस्था उभी करावी.’’
काही वेळा सामाजिक संस्था पुढाकार घेतात. त्यांना प्रशासनाची साथ मिळणेही आवश्यक आहे. शंकरच्या अंत्यविधीसाठी झालेला विलंब हा व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारा आहे.


आज शंकर होता, उद्या दुसरा कोणीही असू शकतो. प्रत्येक वेळी मृत्यूनंतर धावपळ करण्यापेक्षा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. जिवंतपणी या लोकांना आधार मिळत नाहीच, पण किमान मृत्यूनंतर तरी त्यांचा सन्मान राखला जावा.
- शोभा परदेशी, नगरसेविका, तळेगाव दाभाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी निर्णायक वळणावर, कपिल सिब्बल यांनी चंद्रचूड यांच्या निरीक्षणाचा दिला दाखला; काय घडलं?

प्रकरण मिटवण्यासाठी १ कोटी! ट्रेनी IPSची पहिल्याच पोस्टिंगमध्ये लाचखोरी; कोर्टाने DGPकडे मागितला अहवाल

Syria Court Verdict : सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा; भावालाही मृत्युदंड, न्यायालयाचा मोठा निर्णय

“स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू!” ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या डान्सने वेधलं लक्ष, Viral Video

Marathi News Live Updates : १९९९ च्या पक्षघटनेत मुख्य नेता पद नव्हतं मग ते शिंदेंना कुणी दिलं? कपिल सिब्बल यांच्या सर्वात मोठा युक्तिवाद

SCROLL FOR NEXT