पुणे

शंकर माळवदे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

CD

शंकर माळवदे यांचा
नगरसेवकपदाचा राजीनामा
सातारा, ता. ७ : पालिकेचे स्‍वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांनी बुधवारी दुपारी आपल्‍या पदाचा राजीनामा जिल्‍हाधिकारी संतोष पाटील यांच्‍याकडे सादर केला. वैयक्तिक कारणास्‍तव हा राजीनामा देत असल्‍याचे श्री. माळवदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
आठ महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या पालिकेच्‍या निवडणुकीत भाजपचे नगराध्‍यक्ष अमोल मोहिते यांच्‍यासह पन्नास नगरसेवक निवडून आले. यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्‍या गटाकडून दोन नगरसेवक स्‍वीकृत म्‍हणून निवडण्‍यात आले. यात शंकर माळवदे यांचा समावेश होता. गेली २५ वर्षांहून अधिक श्री. माळवदे हे साताऱ्यात राजकारण, समाजकारणाच्‍या माध्‍यमातून सक्रिय आहेत. १९९६ ते २००२ या काळात भाजपचे शहराध्‍यक्ष म्‍हणूनही कार्यरत होते. या काळात पक्ष बांधणीसह इतर भरीव उपक्रमांची यशस्‍वी अंमलबजावणी केली होती.
पालिकेच्‍या प्रशासनाचा अनुभव असल्‍याने त्‍यांना पुन्‍हा एकदा सभागृहात संधी देण्‍यात आली. स्‍वीकृत नगरसेवकपदाचा कार्यभार स्‍वीकारल्‍यानंतर त्‍यांनी शिक्षण व इतर समित्‍यांमध्‍ये सक्रिय सहभाग नोंदवला. पालिकेच्‍या शाळांचा दर्जा उंचावण्‍यासह शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यात त्‍याचे मोठे योगदान आहे. सर्वसाधारण सभेत विविध मुद्दे अभ्‍यासू आणि प्रभावीपणे मांडत त्‍यांनी विविध विकासकामांना चालना देण्‍याचे काम केले. माजी सैनिकांचे प्रश्‍न आणि अडचणी सोडवण्‍यासाठी सक्रिय असणाऱ्या माळवदे यांना शहरासह जिल्ह्याच्‍या विविध भागांत मोठा जनसंपर्क आहे. सातारकरांच्‍या सेवेसाठी यापुढेही कार्यरत राहणार असल्‍याची प्रतिक्रिया माळवदे यांनी राजीनाम्‍यानंतर ‘सकाळ’कडे नोंदवली.

.........
55907 : आयकार्ड फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Shendurwada News : रक्तरंजित वाळू, जमिनीच्या व्यवहाराची नशा, अन् विकासकामांतील भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावण्याचा नाद सुटेना

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT