swagat palkhi.jpg
swagat palkhi.jpg 
पुणे

चला वारीला : चुकली आमटी- भाकरीची न्याहारी, नको विरह हा श्रीहरी

शंकर टेमघरे

Wari 2020 : पुणे आणि सातारा अशा दोन जिल्ह्यांची वाटचाल संपवून माऊलींचा पालखी सोहळा बरडनंतर धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो. आता वाटचाल अंतिम टप्प्यात आलेली असते. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह असतो. पंढरपूर टप्प्यात आल्याची भावना वारकऱ्यांच्या मनात असते. बरडचा मुक्काम उरकून पालखी सोहळा भल्या पहाटेच मार्गस्थ होतो. धर्मपुरी येथे तोफांच्या सलामीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले जाते. पहिल्या वर्षी मला ते विशेष वाटले. तोफा कशा उडतात, हे मला पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्याने, त्याबद्दल कमालीची उत्सुकता होती. धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी माऊलींची पालखी सकाळी न्याहारीसाठी कुंभारगावकरांच्या समाधी मंदिरात जाते. तेथे कुंभारगावकरांच्या वंशजाच्या वतीने कीर्तन होते. कुंभारगावकर म्हणजे निष्ठावान वारकरी. वारीत चालत असताना त्यांनी देह ठेवला. त्यावेळी त्यांच्यावर पालखी मार्गालगतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे तेथेच मंदिर उभारण्यात आले. तेथे माऊलींच्या पालखीचा विसावा असतो. तेथे कुंभारगावकरांच्या वंशजांच्या वतीने झणझणीत आमटी आणि भाकरी असा न्याहारीचा बेत असतो.

ट्रकमध्ये हजारो बाजरीच्या भाकरी आणि मोठ्या टोपात उकळत असलेली आमटी पाहिली की, कोणीही न्याहरीला बसणारच...! ती आमटी- भाकरी खाताना माझ्यातरी डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण ती खाल्ल्याशिवाय वारीला आल्यासारखे वाटत नाही, हेही खरे...! त्यामुळे आम्ही पत्रकारही तेथे सकाळची न्याहारी करतो. अर्थात आमची खातरदारी म्हणजे तंबूत बसण्याची सोय... बाकी शेतात पंगत बसते. त्यात वारे आले, तर आमटीला मातीची दुसरी फोडणी बसते. पण वारकरी मोठ्या आनंदाने त्याचा आस्वाद घेतात. आमटीत चुरून भाकरी खाल्याशिवाय त्याची चवच लागत नाही, असे म्हटले जाते. ते येथे साक्षात पाहायला मिळते.

तोफा कशा उडतात, याची मला उत्सुकता असल्याने आम्ही लवकरच पुढे चालत निघालो. धर्मपुरीच्या वेशीवर भव्य कमान उभारण्यात आली होती. मंडप टाकण्यात आला होता. त्यात सोहळ्यासमवेत आलेल्या मानकऱ्यांना बोलावून फेटा बांधला जात होता. त्यांचे स्वागत केले जात होते. माझे लक्ष तोफांकडे होते. पण तेथे काही तोफा दिसेनात. मला वाटले, नंतर आणत असतील म्हणून मी थांबून राहिलो. दिंड्या कमानीतून आत येऊ लागल्या. त्यापाठोपाठ माऊलींचा रथ आला. तेव्हा तेथे आवाज झाला. मी घाईने मंडपाच्या मागे आवाजाच्या दिशेने गेलो, तर तेथे धुराळा उडाला होता. त्या शिवकालीन तोफा नव्हत्या, तर उखळी तोफा उडविल्या जात होत्या. त्यानंतर मी माझ्या बातमीत अगदी तसाच उल्लेख केला... उखळी तोफांनी माऊलींचे जंगी स्वागत...!

धर्मपुरी कॅनॉलला हजारो वारकरी आपले कपडे धुवून घेतात. तेथे दुपारच्या जेवणाचा विसावा असल्याने तेथील झाडाझुडपात वारकरी काही मिनिटांची विश्रांती घेतात आणि नातेपुत्याच्या दिशेने चालायला लागतात. तेथे माऊलींच्या सोहळ्याचा मुक्काम असतो.
यंदा पालखी नसल्याने सारेच ओसाड... ना उखळी तोफांनी स्वागत, ना झळाळणाऱ्या स्वागत कमानी... या टप्प्यातील एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे कुंभारगावकरांच्या समाधी मंदिराची. या महात्म्याने आपला देह या मार्गावर ठेवला. देह सोडल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी न नेता तेथेच लाखोंच्या समुदायाच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आत्म्याला आज काय वाटले असेल. आपले जीवन जिथे संपले, तिथे माऊली येऊन थांबते. किती ते पवित्र ठिकाण...! आज मात्र कुंभारगावकर वाट पाहत असणार माऊलींची... वारी हेच सर्वस्व मानून चालणारी वारकरी मंडळी निष्ठेला पक्की असतात. त्यांचा भाव शुद्ध असतो. वाणी पवित्र असते.

कोरोनामुळे यंदा पायी वारी रद्द झाली खरी, पण या कुंभारगावकरांच्या समाधीस्थळाबाबत कोणीच काही विचार केला नाही का? त्यांच्या भावना कोणी समजून घ्यायच्या? त्यांच्या आत्म्याच्या आजच्या भावना नाही सांगता येणार शब्दांत. त्यांच्या वंशजांनी मंदिरात पूजा- अर्चा केलीही असेल. पण त्या पवित्र आत्म्याने माऊलींचा, वारकऱ्यांचा विरह कसा सहन केला असेल? काही मिनिटांचा का होईना, माऊलींचा वाटचालीत तेथे होणारा विसावा, हा निश्‍चित कुंभारगावकरांच्या आत्म्यास समाधान देणारा असणार, यात शंका नाही. पण आता विरह भावनेतच कुंभारगावकरांना पुढचे वर्षभर राहावे लागणार, हे खरे. त्यांच्या समाधीस्थळाला विरह वाटत असेल, तर लाखो वारकऱ्यांना भावनेचा विचार न केलेलाच बरा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT