पुणे

कास - कोंडाई चॅरिटेबल ट्रस्टचे वार्षिक पुरस्कार प्रदान...

CD

तेटलीत शंकरराव साळुंखे, शकुंतला सकपाळ पुरस्कार

कास, ता. २२ ः तेटली (ता. जावळी) येथे कोंडाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जावळी पंचायत समितीचे माजी सदस्या शकुंतला सकपाळ, माजी उपसभापती शंकरराव साळुंखे यांना कोंडाई सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख पारितोषिक असे होते. कोयना विभागातील ४३ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आनंद कदम, ३२ गाव समाज सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष हभप कोंडीराम कदम आणि २२ गाव समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरिबा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ट्रस्टतर्फे गरजू व्यक्तीला कीट वाटप करण्यात आले. जिजामाता महिला मंडळ तेटली आणि कोंडाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हळदी -कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हभप बाळकृष्ण महाराज शिंदे, गणेश भोसले, एकनाथ पाटील, अंकुश शिंदे, हरिभाऊ साळुंखे, विलास फाळके, भीमराव केंजळे व ग्रामस्थ उपस्थित होते. ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रताप भोसले व सचिव प्रशांत भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उज्ज्वला भोसले-जाधव यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्ट उपाध्यक्ष प्रकाश भोसले यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट संस्थापक किसन भोसले, मार्गदर्शक आर. डी. भोसले, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रताप भोसले, प्रकाश सुतार, प्रशांत भोसले, वसंत भोसले, भरत भोसले, नंदा भोसले, डॉ. उज्ज्वला भोसले-जाधव, कविता सकपाळ, विजया इंगवले, तसेच ग्रामस्थ मंडळ तेटली, जिजामाता महिला मंडळ तेटली, माऊली मंडळ मुंबई, श्री बाळसिद्धेश्वर प्रतिष्ठान तेटली यांनी मेहनत घेतली.

04702
तेटली : कोंडाई चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार शंकरराव साळुंखे यांना प्रदान करताना मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT