जनतेच्या सुख-दुःखात
धावून जाणारा आपला ‘भाऊ’
आयुष्यात काही माणसे नात्याने जवळची असतात; पण काही माणसे आपल्या कठीण काळात साथ देऊन मनाने आपली होतात. आमदार शंकरभाऊ मांडेकर, माझ्यासाठी आपण अशाच माणसांपैकी एक आहात. आपण दिलेली साथ, प्रेम, विश्वास आणि आपुलकी कोणत्याही शब्दांत व्यक्त करता येणार नाही. काही उपकार पैशाने किंवा शब्दांनी फेडता येत नाहीत; ते आयुष्यभर मनात जपावे लागतात.
- विनोद सुर्वे पाटील, सरपंच, जामगाव- दिसली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची साक्ष देणाऱ्या बारा मावळाच्या भूमीत भोर, राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी शंकरभाऊ मांडेकर समर्थपणे सांभाळत आहेत. शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारा सच्चा मावळा म्हणून त्यांची वाटचाल सुरू आहे, याचा आम्हा मावळ्यांना सार्थ अभिमान आहे.
डोंगरदऱ्यांत, वाड्या- वस्त्यांमध्ये आणि गावागावांत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या अडचणींची जाण असलेले भाऊ जनसेवेत सातत्याने कार्यरत आहेत. सकाळी वेल्ह्यात, दुपारी भोरमध्ये आणि संध्याकाळी मुळशीत, असा त्यांचा मतदारसंघातील वावर पाहिला की त्यांच्या कामाची धडपड आणि जनतेप्रति असलेली तळमळ जाणवते. आमदारकीच्या जबाबदारीसोबतच प्रत्येक सामान्य माणसाशी असलेले आपले नाते त्यांनी जपले आहे.
‘सर्वसामान्यांचा नेता’ हीच भाऊंची खरी ओळख आहे. अत्यंत साध्या कार्यकर्त्यांमध्ये रमणारे भाऊ आजही पूर्वीसारखेच आहेत. म्हणूनच जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा कायम आहे. आमदारकी त्यांनी कामात आणली; मात्र ती स्वभावात कधीच उतरू दिली नाही. त्यामुळे गावखेड्यातील कार्यकर्त्यापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आपले सुख-दुःख भाऊंसोबत मोकळेपणाने व्यक्त करावेसे वाटते. आणि भाऊही आपल्या कामांचा प्रचंड व्याप सांभाळत प्रत्येकासाठी वेळ काढतात.
‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले’ या उक्तीप्रमाणे भाऊंचे काम सुरू आहे. मी सरपंच असलेल्या जामगावच्या विकासासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत त्यांनी गावाच्या विकासाला नवी दिशा दिली. ही केवळ निधीची बाब नाही, तर गावाच्या विकासाच्या स्वप्नावर भाऊंनी दाखवलेला विश्वास आहे. भोर, राजगड आणि मुळशी या तीनही तालुक्यांत विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी त्यांची पायाभरणी सुरू आहे.
मात्र, शंकरभाऊंबद्दल माझ्या मनात असलेला आदर केवळ त्यांच्या राजकीय किंवा विकासकामांमुळे नाही. माझ्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगी त्यांनी दिलेली साथ माझ्यासाठी अधिक मोलाची आहे. ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा होती, त्यांनीही त्या वेळी पाठ फिरवली होती. अशा वेळी ना माझ्या गावातील, ना माझ्या वाड्यातील असूनही भाऊंनी आपुलकीने माझी विचारपूस केली, माझ्या कुटुंबाची काळजी घेतली आणि आधार दिला.
संकटाच्या काळात एखाद्याने केलेली छोटीशी विचारपूसही किती मोठा आधार देऊ शकते, हे त्या वेळी मला जाणवले. कारण संकटात शब्दांपेक्षा सोबत उभे राहणारे माणूस महत्त्वाचे असते. भाऊंनी ते करून दाखवले. आजही दिवस असो वा रात्र, कोणतीही अडचण आली तर एका फोनवर मदतीसाठी तत्पर राहणारा हा माणूस माझ्यासाठी केवळ आमदार नाही, तर कुटुंबातीलच एक जिव्हाळ्याचा आधार आहे.
शंकरभाऊ, आपल्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि जनसेवेची आणखी मोठी ताकद देवो. जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा आपला हा आपुलकीचा हात असाच कायम राहो आणि आपल्या नेतृत्वातून भोर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडत राहो, हीच मनापासून प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, शंकरभाऊ!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.