पुणे

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक शांतीलाल जैन यांचे निधन

CD

PNE26W29710 शांतिलाल जैन

रा. स्व. संघाचे स्वयंसेवक
शांतिलाल जैन यांचे निधन

सोलापूर, ता. २४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा कार्यवाह शांतिलाल रिखबचंद जैन (वय ७८) यांचे हैदराबाद येथे बुधवारी (ता. २४) पहाटे चार वाजता निधन झाले. त्यांच्यावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, पुत्र उद्योजक महेंद्र, चार विवाहित कन्या, बंधू सूरजमल असा परिवार आहे.
त्यांनी रा. स्व. संघाचे पंढरपूर आणि सोलापूर (संयुक्त) जिल्ह्याचे (१९८७/१९९३) जिल्हा कार्यवाह म्हणून दायित्व निभावले होते. तत्पूर्वी (१९८२/८७) सोलापूर शहर कार्यवाह होते. रामजन्मभूमी आंदोलन आणि डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी काळात संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये संघ कार्य विस्तारात त्यांचे मोठे योगदान होते.
मूळचे राजस्थानातील असलेले शांतिलाल जैन हुबळी येथून सोलापुरात व्यवसायानिमित्त आले. वह्यांचे मोठे उत्पादक म्हणून प्रसिद्ध होते. १९८९ मध्ये संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी काळातच डॉ. हेडगेवार रक्तपेढी स्थापन झाली. या रक्तपेढीचे ते संस्थापक सदस्य होते. भाजपची तेव्हा नव्यानेच स्थापन झाली होती. त्यांनी पुढाकार घेत माजी खासदार कै. लिंगराज वल्याळ, विहिंपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुरेशचंद्र देशमुख गुरुजी यांचे पुत्र सुभाष देशमुख यांच्यासह अनेक संघ स्वयंसेवक भाजपला दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT