पुणे

शरद जोशींच्या जयंतीनिमित्त आज अडगावमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

CD

शरद जोशी जयंतीनिमित्त
आज अडगावात शिबिर

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला : शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त (रघुनाथदादा पाटील प्रणीत) शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवारी (ता. ३) तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रूक येथे होणार आहे.
शिबिराच्या निमित्ताने सकाळी ११ वाजता शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन करून शिबिराला सुरुवात होईल. शिबिरामध्ये शेतकरी, तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता जिल्हाध्यक्षांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कालिदास अपेट यांचे दुपारी १२.३० वाजता मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १ वाजता संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजी खुपे मार्गदर्शन करतील.
दुपारी १.३० वाजता संघटनेच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. प्रगती खरे-चव्हाण यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता ज्येष्ठ विधिज्ञ तथा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे मार्गदर्शन करतील.
शिबिराचे अध्यक्षीय मार्गदर्शन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथदादा पाटील करतील. शेतकरी संघटनेच्या विचारांशी बांधिलकी असलेल्या शेतकरी व कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक तथा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : ...'मग माझा राजीनामा का मागता?' पेपरफुटीवरुन 'एमपीएससी'चे अध्यक्ष विवेक भीमनवारांचे खुले पत्र

सूर्यकुमार यादव विरुद्ध श्रेयस अय्यर; ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी पुन्हा मुंबईकर समोरासमोर, नेमकं काय घडतंय?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाचा OBC 'क्रिमी लेयर' आरक्षणावर मोठा निर्णय; केंद्राला अंतरिम दिलासा देण्यास नकार

मराठी कलाकारांना हिंदी मालिकांच्या सेटवर कसं वागवलं जातं? ‘वहिनीसाहेब’ फेम अभिनेत्रीने सांगितलं सेटवरचं वातावरण

‘बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय…’ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा डान्स पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT