Sharad Mohol murder case sakal
पुणे

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरण; आरोपींना पाच दिवसांची, दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणामधील संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गुंड शरद मोहोळ खून प्रकरणामधील संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. विशेषतः या प्रकरणात पोलिसांनी दोन वकिलांना ताब्यात घेतल्याने वकीलांनी गर्दी केली होती. पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवत पुरेपूर खबरदारी घेतल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, न्यायालयाने सहा संशयित आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शरद मोहोळ खून प्रकरणातील संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने न्यायालयाच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर जाण्याच्या प्रवेशद्वारावर नागरिकांना पोलिसांकडून चौकशी करून सोडण्यात येत होते.

तर पहिल्या मजल्यावरील बिराजदार कोर्टाच्या बाहेरचा भाग टेबल टाकून बंद करण्यात आला होता. दुपारी संशयित आरोपींना घेऊन पोलिसांची वाहने न्यायालयाच्या आवारात दाखल झाली, त्यानंतर त्यांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस.सी बिराजदार कोर्टासमोर हजर करण्यात आले.

या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमधील दोन वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे वकिलांकडून नाराजी व्यक्त वकील न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.

दरम्यान, सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी, या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्यांना बेकायदा शस्त्रे कुणी पुरवली? त्यामागील उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करत चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर वकीलांच्यावतीने ॲड. एन. डी. पाटील, ॲड.एच.व्ही.निंबाळकर, ॲड. शहा व ॲड. विश्‍वजीत पाटील यांनी, वकील कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते, त्यांना सूचना, सल्ले द्यावे लागतात.

त्यासाठी त्यांना आरोपी करण्याची गरज नाही, ते तपासाचा भाग होत नाहीत, असा जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित गुन्ह्यातील वकिलांचा सहभाग सिद्ध होणे आवश्‍यक असल्याचे सांगत ॲड.रवींद्र पवार व ॲड.संजय उढाण या दोन वकिलांना ८ जानेवारीपर्यंत तर साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

...आणि वकिलास अश्रू अनावर झाले!

""आम्हाला आरोपींचा फोन आला की त्यांनी खून केला असून, त्यांना सरेंडर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला देत, त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली. त्यावेळी तिथे आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितले. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही' अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलाने आपली बाजू मांडली, तर 'आम्ही १५ वर्ष वकीली व्यावसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही' असे सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT