Sharad Mohol Murder Latest Update 
पुणे

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक! धक्कादायक माहिती आली समोर

काही दिवसांपूर्वी पुण्यात भरदिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची तीघांनी गोळीबार करत हत्या केली, या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

रोहित कणसे

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात भरदिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची तीघांनी गोळीबार करत हत्या केली, या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येनंतर पोलीसांना तत्काळ कारवाई करत आठ आरोपींना अटक देखील केली. यानंतर आता पुन्हा याप्रकरणी हत्येसाठी पिस्टल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. (Sharad Mohol Murder Latest Update)

महत्वाचे म्हणजे हा गोळीबार करण्यापूर्वी आरोपीनी मुळशीत ३ वेळा सराव केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याचा पुण्यातील त्याच्याच राहत्या घराजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली.

अटक केलेल्या या दोघांनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल आरोपींना पुरवले असल्याची माहिती समोर आली आहे. धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शरद मोहोळचा ५ जानेवारी भरदुपारी सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. या आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला होता. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा) अशी पोलिस कोठडीत वाढ केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहोळ खून प्रकरणात यापूर्वी आठ जणांना अटक केली असून, त्यापैकी या सहा जणांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, त्यानंतर आरोपींच्या कोठडीत पुन्हा सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT