NCP Esakal
पुणे

NCP: पवार कुटुंबियांच्या स्नेहभोजनानंतर अजित पवार दिल्लीला रवाना, अमित शाहांची घेणार भेट

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचं पुण्यात स्नेहभोजन; भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील अजित पवारांसह ९ नेत्यांनी भाजप-शिवसेना यांच्यासोबत सत्तेत सामील झाले. त्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले. अजित पवार गटाने पक्ष नाव आणि चिन्हावर दावा सांगितला. याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे, अशातच आज (शुक्रवारी) अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एकत्र आले. पुणे शहरात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी सर्व जण एकत्र आले होते.

शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. त्यांच्या निवासस्थानी सर्वांची भेट झाली आहे. त्यानंतर अजित पवार दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.यासंबधीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहीनीने दिले आहे.

ही भेट दिवाळीनिमित्त झाली असल्याची माहिती आहे. पुण्यातील बाणेरमध्ये प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. ही भेट कौटुंबिक होती, असं शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांचे सहकुटुंब जेवण झालं. या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. ही भेट दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट देण्यासाठी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सायंकाळी उशिरा अमित शाह यांच्या निवासस्थानी भेट होणार असल्याची माहिती आहे.

या भेटीबाबत शरद पवारांच्या बहिण सरोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ही भेट कौटुंबिक होती, राजकीय नव्हती, आम्ही सर्वजण एकत्र आलो, खूप दिवसानंतर आम्ही एकत्र भेटलो खूप आनंद झाला. सगळी भावंडं, मुली एकत्र भेटलो. आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवसही होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT