Sharad Pawar
Sharad Pawar  Esakal
पुणे

Sharad Pawar : राज्यातील नागरिकांनी शांतता बाळगण्याचे शरद पवार यांचे आवाहन

मिलिंद संगई,

बारामती - राज्यातील कोल्हापूरसह अन्य काही ठिकाणी जे प्रकार घडले ते पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे आहेत, महाराष्ट्राची प्रतिमा एक शांतताप्रिय राज्य म्हणून देशभरात आहे. जाणीवपूर्वक वादविवाद वाढविण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर त्याची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते, त्यामुळे असे प्रकार घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, असे प्रतिपादन जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

बारामती माध्यमांशी बोलताना पवार यांनी राज्यातील सर्व नागरिकांनी शांतता बाळगण्याचे आवाहन केले. चार दोन लोक चुकीचे वागत असतील, तरी इतर सर्वांनी संयमाची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यामध्ये शांतता प्रस्थापित होईल असे ते म्हणाले.

नैसर्गिक आपत्ती नंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीचा हात दिला जात नाही, हे मला माझ्या विदर्शाच्या दौऱ्याच्या वेळेस लक्षात आले. गारपीट व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांच्यापर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही, ही बाब योग्य नव्हे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक असताना त्याच्या संकटाच्या काळात सरकारने त्याच्या पाठीशी उभे राहून केली पाहिजे. शेतकऱ्यांचा मदतीचा आग्रह अजिबात चुकीचा नाही, त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न हे आमच्यासारखे लोक सुद्धा कायमच करतील असेही त्यांनी नमूद केले.

देशातील विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची एक बैठक बोलाविली आहे. नितीशकुमार यांचा मला फोन आला होता व मीही त्या बैठकीला जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत देशासमोरील प्रश्नावर भूमिका घेण्याची गरज आहे. नितीश कुमार यांचा हा प्रयत्न असून त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, राज्य सरकारने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या सोबत राहून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.

दुधाचा दर पडल्याने शेतकरी अडचणीत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्याचा निर्णय ठराविक काळासाठी घेतला गेला होता. आज दुधाची किंमत घसरली आहे. दूध उत्पादकांच्या दृष्टीने ही बाब योग्य नसून आगामी काही दिवसात या संदर्भात राज्य सरकार सोबत चर्चा करणार असून मुख्यमंत्र्यांची भेट घेत यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांना करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT