Sharad Pawar at MPSC student Protest meet students phone call cm eknath shinde netzines reactions  
पुणे

Sharad Pawar News : "८३ वर्षांचा योद्धा विद्यार्थ्यांसाठी मैदानात"; पवारांची कमिटमेंट पाहून नेटकरी भारावले

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात दोन दिवस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन करण्यात आलं. एमपीएससीची परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थीआंदोलन करत आहेत.

दरम्यान काल रात्री हजारोंच्या संख्येमध्ये विद्यार्थी उपस्थित असताना या गर्दीमध्ये शरद पवार सहभागी झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. या वेळी परिसर विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला.

रात्री अकरा वाजता पवार घटनास्थळी दाखल झाले. पवार येणार याची माहिती विद्यार्थ्यांना लागतात चौकात प्रचंड गर्दी झाली. या वेळी ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही आंदोलनकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर आंदोनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दाखल झाले आणि सोशल मीडियावर त्यांच्याचं नावाची चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांचं सोशल मीडीयावर कौतुक होत आहे. तर पुण्यात असूनही विद्यार्थ्यांची भेट न घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जातेय.

शरद पवार मध्यरात्री विद्यार्थ्यांना भेटले यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केरत पवारांचं कौतुक केलं आहे. "आज हा 83 वर्षाचा योद्धा एमपीएससीच्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांना जाऊन रात्री भेटले ... समस्या सुटणार ..."

तर सलीम सारंग यांनी "तीन दिवस नमुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री पुण्यात असून विद्यार्थ्यांना भेटायला आले नाही. तिकडे या वयात पवार साहेब महाराष्ट्र पिंजून काढतात… राजकारण बाजूला ठेवत साहेब जे समाजकारण करतात हाच त्यांचा आदर्श सगळ्याच राजकारण्यांनी घ्यायला हवा… "असं ट्वीट केलं आहे. त्यांनी यासोबत शरद पवार यांचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

प्रमोद गायकवाड पाटील या ट्वीटर यूजरने शरद पवार आंदोलनस्थळी दाखल होत असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत "आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मैदानात #MPSC2025 अभ्यासक्रम साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू. रात्री पवार साहेब विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. जिथे कुणाचीही साथ मिळत नाही तिथे पवार साथीला येतात" असं म्हटलं आहे.

ऋतुराज देशमुख नावाच्या य़ुजरने राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत शरद पवारांबद्दल ट्वीट केलं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.

त्यांनी लिहीलं की, "राज्यातील सत्ताधारी नेते सत्तेचा टेकू टिकवण्यासाठी कोणी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे, तर जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे उपमुख्यमंत्री पोटनिवडणुकीसाठी सर्व राज्याचा कारभार सोडून पुण्यात तळ ठोकून आहेत.दुसरीकडे विरोधी बाकावरील 83 वर्षांचे नेते तरुणांच्या मनात असलेल्या समस्या आणि रोषाचे निराकरण करण्यासाठी रात्री ११ वाजले तरी जाऊन संवाद साधत आहेत..."

"शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक असल्याचे वारंवार सिद्ध करत आहेत" असं ट्वीट सार्थक कारखानीस यांनी केलं आहे.

शरद पवार काय म्हणाले..

रात्री आंदोलनस्थळी पोहचलेल्या शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या गराड्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.या फोन कॉलनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येणार असून दोन दिवसांत आपण बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती शरद पवार यांनी विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी पवार म्हणाले, ‘‘अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करावी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक आयोजित केली जाईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मी उपस्थित असेल.’’

आंदोलनाच्या ठिकाणावरून शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून या संदर्भात चर्चा केली. शिंदे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. ही घोषणा पवार यांनी करताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून तसेच मोबाईलची टॉर्च लावून याचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT