पुणे

महागाईच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

CD

बारामती, ता. ३ : ‘‘देश आणि राज्याची अर्थव्यवस्था अडचणीत असून, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले आहे. मात्र, मूळ प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून विविध मुद्दे पुढे आणून सरकारकडून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे,’’ असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.
गुरुवारी (ता. ३) बारामतीत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘तिमाही जीडीपीबाबत केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्र उभे करण्याचा प्रयत्न करीत असले, तरी प्रत्यक्षातील आर्थिक समस्या आणि महागाईकडे दुर्लक्ष होत आहे. रुपयाची घसरण झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर अधिक भार पडेल आणि महागाईच्या झळा वाढतील.’’ ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यासाठी १६ ऑक्टोबरची तारीख सुचविण्यात आली असून, ती पुढे-मागे होऊ शकते. बारामतीतील देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संस्थेची पाहणी व सादरीकरणासाठी त्यांचा दौरा नियोजित आहे,’’ असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले...
- मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत मंत्री कोणता निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
- विद्यार्थी आंदोलनाबाबत सरकारच्या धोरणातील त्रुटींकडे न्यायव्यवस्थेनेही लक्ष वेधले असून, लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे.
- साखरेच्या वाढत्या दराचा अपेक्षित फायदा ऊस उत्पादकांना मिळालेला नाही. वाढीव दरातील काही हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. साखर आयातीला विरोध आहे.
- राज्यातील पावसाची स्थिती चिंताजनक असून मराठवाड्यासह अनेक भागांना दुष्काळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. दुबार पेरणी व पाण्याचे प्रश्न गंभीर बनत असल्याने संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.
- तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दुधातील भेसळ थांबली असून, भेसळमुक्त दुधासाठी ग्राहक अधिक पैसे देण्यास तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Illegal Road Block: ९ कोटींच्या डांबरी रस्त्यावर बेकायदेशीर माती-दगडांचे ढिगारे; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पीएमआरडीए निष्क्रिय

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा; कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले, दीड तास रास्ता रोको

Marathi News Live Updates: जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा

रोहित शर्माचे भवितव्य ते अजित आगरकरांची गैरहजेरी... BCCI च्या Meeting मध्ये नेमकं काय घडलं?

अय्यो! टॉक्सिल'ला मागे टाकणाऱ्या 'हनुमान अंश'मध्ये झळकतेय मराठमोळी अभिनेत्री; सध्या स्टार प्रवाहवर करतेय काम, कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT