पुणे

गोवामुक्ती आंदोलनापासून नेतृत्वाचे धडे : शरद पवार

CD

गोवामुक्ती आंदोलनापासून
नेतृत्वाचे धडे : शरद पवार

रयत संस्थेच्या प्रवरानगर येथील विविध इमारतींचे उद्घाटन

कोल्हार, जि. अहिल्यानगर : ‘‘विद्यार्थिदशेत गोवामुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यानेच आपल्या सार्वजनिक जीवनातील संघर्षाची सुरुवात झाली,’’ अशी आठवण रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितली.
रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील विविध इमारतींचे उद्घाटन तसेच ‘पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सभागृह’ भूमिपूजन समारंभ बुधवारी (ता. २४) पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी आमदार दिलीप वळसे पाटील होते. तसेच खासदार नीलेश लंके, माजी आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, मीनाताई जगधने, डॉ. चंद्रकांत दळवी, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, भगीरथ शिंदे, रावसाहेब म्हस्के, अरुण कडू व एकनाथ घोगरे उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘मी प्रवरानगर येथील रयतच्या शाळेत शिकत असताना गोवामुक्ती संग्राम सुरू होता. ना. ग. गोरे, मधु दंडवते आणि हिरवे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांना एकत्र करून आम्ही प्रवरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गेलो होतो. आंदोलनाला पाठिंबा म्हणून कारखाना बंद ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी, ‘कारखाना बंद ठेवल्याने गोवामुक्ती होणार असेल, तर आम्हाला हरकत नाही,’ असे सांगितले होते.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आजचा समारंभ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. रयत शिक्षण संस्थेची सर्वाधिक प्रगतिशील वाटचाल अहिल्यानगर जिल्ह्यातून झाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रवरा परिसरात पहिली शाखा प्रवरानगर येथे सुरू केली. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, कॉ. पी. बी. कडू पाटील आणि शंकरराव धुमाळ यांनी त्यांना मोलाची साथ दिली. कर्मवीरांनी ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली केली. आज रयतचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले असून महात्मा गांधी विद्यालयाची ही शाखा महाराष्ट्रात नावारूपाला येईल, असा विश्वास आहे.’’
आमदार वळसे पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना केवळ साक्षर करणे किंवा पदवी मिळवून देणे पुरेसे नाही. आधुनिक कौशल्ये आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरी भागांप्रमाणे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यातूनच जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहता येईल. शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे रयत शिक्षण संस्थेची वाटचाल काळानुरूप होत आहे.’’
या वेळी बाळासाहेब थोरात, डॉ. ज्ञानदेव म्हस्के आणि भगीरथ शिंदे यांचीही भाषणे झाली. संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अमृत गाथा’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
-----------
हे घेऊ नये
कोल्हार, जि. अहिल्यानगर : ‘‘मी प्रवरानगरला रयतच्या शाळेत शिकत असताना गोवामुक्तीच्या संग्राम आंदोलन सुरू होते. ना.ग.गोरे, मधु दंडवते ,हिरवे गुरुजी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली संग्राम सुरू होता. त्यावेळी मी विद्यार्थ्यांना एकत्र करून प्रवरा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गेलो होतो.आम्हाला पाठिंबा म्हणून म्हणून कारखाना बंद ठेवण्याची विनंती कारखान्याच्या प्रशासनाला केली होती. त्यामुळे पद्मश्री विखे पाटील म्हणाले होते, की कारखाना बंद ठेवून गोवामुक्ती होणार असेल तर बंद ठेवण्यास आमची हरकत नाही. माझ्या सार्वजनिक जीवनातील संघर्षाची सुरुवात विद्यार्थीदशेत  झाली. अशी आठवण  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगितली. रयत संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील विविध इमारतींचे उद्घाटन तसेच पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार सभागृहाचा भूमिपूजन समारंभ आज झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार दिलीप वळसे पाटील होते. यावेळी खासदार निलेश लंके, माजी आमदार बाळासाहेब थोरात ,डॉ.सुधीर तांबे, मीनाताई जगधने, डॉ. चंद्रकांत दळवी , कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, भगीरथ शिंदे, रावसाहेब म्हस्के ,अरुण कडू व एकनाथ घोगरे उपस्थित होते. पवार म्हणाले की,आजचा समारंभ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. रयत शिक्षणाची सर्वाधिक प्रगतीपर वाटचाल अहिल्यानगर जिल्ह्यातून झाली. कर्मवीरांनी प्रवरा परिसरात पहिली शाखा प्रवरानगरला काढली.पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, डॉ.धनंजयराव गाडगीळ, कॉम्रेड पी.बी. कडू पाटील व शंकरराव धुमाळ यांनी साथ दिली. कर्मवीरांनी ज्ञानाचे दरवाजे खुले केले.रयतचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.महात्मा गांधी विद्यालय त्यापैकी एक असून ही शाखा महाराष्ट्रात नावारूपास येईल.असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. वळसे पाटील म्हणाले की, विद्यार्थी केवळ साक्षर करणे व पदवी मिळविणे महत्त्वाचे नसून आधुनिक कौशल्य तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. शहरीप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.तरच आपण जागतिक पातळीवर स्पर्धा व प्रभुत्व ठेवू शकतो. शरद पवारांमुळे रयतची वाटचाल बदलत्या काळानुसार चालू आहे. बाळासाहेब थोरात, ज्ञानदेव म्हस्के, भगीरथ शिंदे आदींची याप्रसंगी भाषणे झाली. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त '' अमृत गाथा '' या विशेषांकाचे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

Latest Marathi News Live Update : जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT