Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar : निष्ठा ठेवणाऱ्यांनाच मतदार देणार कौल; मंचरमधील सभेत शरद पवार यांचा दावा

‘सध्या देशात व राज्यात सत्तेवर असलेले राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करून ईडी व सीबीआयचा धाक दाखवितात. ‘तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात या’ अशा धमक्या दिल्या जातात.

सकाळ वृत्तसेवा

मंचर (जि. पुणे) - ‘सध्या देशात व राज्यात सत्तेवर असलेले राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करून ईडी व सीबीआयचा धाक दाखवितात. ‘तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात या’ अशा धमक्या दिल्या जातात. ‘तुरुंगापेक्षा भाजप बरा’ अशी भूमिका घेऊन काहीजण मी उभारलेल्या पक्षातून बाहेर गेले आहेत.

आंबेगाव, खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर येथील लोकप्रतिनिधींनी निष्ठा बदलली. त्यांच्यावर मतदारही निष्ठा ठेवणार नाहीत. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निष्ठा ठेवणाऱ्याच्यांच बाजूने मतदार कौल देतील,’ असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुधवारी (ता. २१) जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. कोल्हे यांच्या ‘विकास पर्व’ पुस्तिकेचे प्रकाशन केले.

शरद पवार म्हणाले, ‘शेतकरी सन्मानाने जगला पाहिजे म्हणून दहा वर्षे कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना भरभरून दिले. पण, सध्या मात्र देशाचे चित्र भयानक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दररोज जाहिरात वाचतो, ‘मोदी की गॅरंटी’ पण, सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत असून, वेदना भोगत आहे. शेती मालाला हमीभाव नाही.

शेतकरी कर्जामुळे हैराण झाले आहेत. मुलांना नोकऱ्या नाही. शेतकरी, आदिवासी यांच्याविषयी मोदींना आस्था नाही. लोकशाही मार्गाने विरोध करणारे अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप मोदींनी केले. ते भीतीपोटी भाजपमध्ये गेले.’

जयंत पाटील म्हणाले, ‘पवारसाहेबांनी उभा केलेला पक्ष व चिन्ह हिसकावून नेण्याचे काम झाले. पण, आम्ही जर खोलात गेलो तर ४० आमदार अपात्र होतील. पण, आम्ही अद्याप टोकाची भूमिका घेतली नाही. याची नोंद घ्या.’

यशाची खात्री नसल्याने फोडाफोडी

कोल्हापूर : देशात विविध सर्व्हे झाले आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा जिंकण्याचे कल आहेत. भाजपला यशाची खात्री नसल्यानेच त्यांनी अन्य पक्षांत फोडाफोडीचे सत्र सुरू केल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला.

भाजपने काढलेल्या श्र्वेतपत्रिकेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आले होते. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्याने आश्‍चर्य वाटले नाही. कारण ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा’ असे लोक म्हणू लागल्याचे पवार म्हणाले.

आंबेगाव तालुक्यातील माजी आमदार अण्णासाहेब आवटे, माजी आमदार दत्तात्रेय वळसे पाटील, विठ्ठलराव बाणखेले, पी. डी. सैद, म्हातारबा जाधव यांच्या माझ्यावर निष्ठा कायम होत्या. येथील लोकप्रतिनिधीला निष्ठा जपता आली नाही. त्यांना आमदार केले, विधानसभा अध्यक्ष व अनेक मंत्री पदे दिली. देश पातळीवरील साखर महासंघाचे अध्यक्ष केले. त्यांना काय कमी केले? सगळी पदे दिली, पण त्यांनी निष्ठा सोडल्या, याची खंत आहे.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ मिनिटाच्या रस्त्यासाठी अर्धा तास! राज ठाकरेंना अनुभवावं लागलं पुण्याचं ट्रॅफिक... रोज कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांच्या मनस्तापात भर

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण?

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Ganesh Chaturthi 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी घेऊन येणार मोठा ट्विस्ट, बाप्पाच्या येण्याने होणार संकटांचा विनाश

Solapur News: रहाटेवाडी-तामदर्डी पूल बांधकामासाठी कोटी ६ कोटी ५० लाख निधी मंजूर, जनतेच्या मागणीला यश

SCROLL FOR NEXT