Sharad Pawar  sakal
पुणे

Sharad Pawar : "आजपर्यंत मी 14 वेळा निवडणुका लढलो, पुन्हा नव्या जोमाने.." शरद पवारांनी ठोकला शड्डू !

ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्ष काढून घेतला, असं यापूर्वी देशात कधी झालं नव्हतं, मात्र राष्ट्रवादीच्या निमित्ताने असं प्रथमच घडलं आहे, मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही

मिलिंद संगई बारामती

बारामती : ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्ष काढून घेतला, असं यापूर्वी देशात कधी झालं नव्हतं, मात्र राष्ट्रवादीच्या निमित्ताने असं प्रथमच घडलं आहे, मात्र संघटनेचे चिन्ह किंवा पक्ष गेल्यामुळे अस्तित्व संपत नाही, असे विधान करून पुन्हा नव्या जोमाने आपण राज्यात संघटना बांधणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज नमूद केले.

बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी माळशिरस तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्यासमोर शरद पवारांनी हा निर्धार बोलून दाखवला. यापूर्वी देशामध्ये अनेकदा पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्या, ज्याने पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून घेणे हे कायद्याला धरून वाटत नाही, त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. त्याचा योग्य निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.

चिन्हाची फार चिंता करायची नाही, आजपर्यंत मी 14 वेळा निवडणुका लढलो. त्यापैकी पाच निवडणुकांचे चिन्ह हे बैलजोडी, गाय वासरू, चरखा, हाताचा पंजा व घड्याळ अशी होती. मात्र चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचा अस्तित्व संपेल, असे कधी घडत नाही.

सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे, त्याला पण नव्याने काय देऊ शकतो यावर विचार केला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत, असा विश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या समोर बोलून दाखवला. आपण नव्या उमेदीने महाराष्ट्रात फिरून लोकांशी संपर्क साधून लोकांना भूमिका पटवून देणार आहोत, त्यामध्ये पक्ष व चिन्ह याची फारशी अडचण येणार नाही, असा विश्वासच शरद पवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT