Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar : देशाचा कारभार मनमानी पद्धतीने चालणाऱ्या दोघांना जनतेने जागेवर आणले

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात पवारांची मोदी-शहा यांच्यावर कडाडुन टीका.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'देशाचा कारभार मनमानी पद्धतीने चालविण्याचे काम दोन व्यक्तींनी केले, आपल्या म्हणण्याप्रमाणेच निती, धोरण हे सूत्र त्यांनी राबविले. पण सर्वसामान्य माणूस हा आपल्यापेक्षा शहाणा आहे. देशातील जनतेनेच त्यांची दखल घेतल्यानंतर आता त्यांच्यावर मर्यादा आल्या आहेत.

सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून या घडामोडी लवकरच देश बघेल.'अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडुन टिका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे शहर पक्ष कार्यालयात आयोजन केले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी खासदार ऍड.वंदना चव्हाण, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी आमदार ऍड.जयदेवराव गायकवाड, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, 'मागील 25 वर्षात संघटना उभी करून महाराष्ट्रात, देशात नवा इतिहास तयार केला. सत्तेशी संबंध नसणारे तरूण पुढे आले. त्यांना राज्यपातळीवर नेतृत्व दिले. आता आपण पक्ष आणखी पुढे घेऊन जाऊ,' अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्षासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान पवार यांच्या हस्ते झाला.

चार महिन्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल

विधानसभेची निवडणूक येत्या तीन-चार महिन्यात होईल. त्यामुळे आता सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष द्यायचे आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत-जास्त लोकांना कसा होईल, याची आपण काळजी घेऊ, असा विश्‍वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

मंत्रीपदाचा फायदा ठेकेदारांना होऊ नये - सुप्रिया सुळे

'लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जबाबदारी वाढली आहे. पुण्यातील उद्योग बाहेर जात आहेत, ही चिंतेची बाब आहे. पुण्याला मंत्रीपद मिळाले, याचा आनंद आहे. पण त्याचा फायदा ठेकेदारांना न होता पुणेकरांना व्हायला पाहीजे.' अशा शब्दात खासदार सुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टिका केली.

रविंद्र धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरीही, ऑक्‍टोबरमध्ये ते पुन्हा आमदार होतील. त्यांनी 'ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह' प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला आहे. पुण्यात प्रशासन नाहीच. कोयता गॅंग तोडफोड करत आहे, पाणी तुंबते आहे. ससूनची बदनामी सुरु आहे. त्यामुळे पुण्यासाठी पक्षविरहीत फोरम स्थापन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT