Sharad Pawar Sakal
पुणे

Pune News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुण्यात नेत्यांकडून भेटीगाठी

पुण्याचे माजी उपमहापौर ॲड. एन. टी. निकम यांची मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली भेट.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कमला नेहरू पार्कजवळील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पुण्याचे माजी उपमहापौर ॲड. एन. टी. निकम यांची मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. त्यांनी अनपेक्षितपणे भेट घेऊन विचारपूस केली.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागूल यांनी आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार यांची त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानाजवळील कार्यालयात भेट घेतली. या वेळी कपिल बागूल, अमित भगत उपस्थित होते. महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे.

या मतदारसंघात आपण चाळीस वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाचे काम करत आहे. या मतदारसंघातून आपण इच्छुक आहे, त्यासाठी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, अशी विनंती बागूल यांनी पवार यांच्याकडे केली. या वेळी उमेदवार निवडून येणे हाच महाविकास आघाडीचा निकष असल्याचे सांगत पवार यांनी संवाद साधल्याचे बागूल यांनी सांगितले.

दरम्यान, पवार हे कमला नेहरू पार्क येथील खासगी रुग्णालयात जवळच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी उपमहापौर ॲड. एन. टी. निकम यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. पवार यांनी ॲड. निकम यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पवार यांच्या अनपेक्षित भेटीने ॲड. निकम यांना गहिवरून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT