बारामती - दौंड-बारामती लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे मंगळवारी भूमिपूजन करताना खासदार सुप्रिया सुळे. या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नेते शरद पवार व रेल्वेचे अधिकारी. 
पुणे

निवडणुकीपर्यंत थांबा; कसे होत नाही बघतो! - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - ‘‘बारामती-फलटण लोहमार्गाबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा निश्‍चित प्रयत्न करू. समजा त्यात अडचण आलीच तर सहा-आठ महिने थांबा. एकदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाली की मी बघतो कसे काम होत नाही ते. त्यामुळे त्याला फार काही वेळ लागणार नाही,’’ असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती-फलटण लोहमार्गाचे काम वेगाने मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

बारामती-दौंड लोहमार्गाच्या विद्युतीकरणाच्या ५६ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आज शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांच्या या विधानाने आगामी निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे काय असतील, या बाबतची चर्चा आज बारामतीत होती. 

बारामती-फलटण लोहमार्गाचे काम झाल्यानंतर बारामती हे रेल्वेच्या नकाशावरील महत्त्वाचे स्टेशन होईल. त्याचा येथील अर्थकारणावर मोठा परिणाम होऊन विकासाची गती वाढेल. हे काम सध्या रेंगाळलेले असले तरी आगामी काळात आम्ही सर्व जण एकत्र बसून त्यात निश्‍चित मार्ग काढू, अशी ग्वाही पवार यांनी या प्रसंगी दिली.

पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर बारामती, जेजुरी, नीरा व दौंड स्थानकांची २२५ कोटींची कामे मार्गी लागली आहेत. बारामतीतील मालधक्का हलविणे व सेवा रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच, बारामती-दौंड विद्युतीकरणाचे काम फेब्रुवारी-२०१९ पर्यंत व्हावे. दौंडचा समावेश पुणे विभागात करून दौंडला बारामतीच्या धर्तीवर रेल्वेच्या जागेत सुंदर उद्यान विकसित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी या वेळी जाहीर केले. मिलिंद देऊसकर यांनी प्रास्ताविकात रेल्वेच्या योजनांबाबत माहिती दिली.

ही कामे होणार...
 जेजुरीत प्लॅटफॉर्मची उभारणी. त्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती
 जेजुरीला आणखी एक रेल्वे ट्रॅकला मंजुरी  
 दौंडला रेल्वेच्या जागेत उद्यान विकसित होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Mumbai News: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेचा अहवाल गुलदस्त्यात, तीन आठवडे उलटले; पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

Farmer Loan Waiver : कोल्हापुरात २३ हजार ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT