शरद पवारांनी सांगितली गायकवाड वाडा-जेधे मॅन्शनची 'ती' आठवण sakal
पुणे

शरद पवारांनी सांगितली गायकवाड वाडा-जेधे मॅन्शनची 'ती' आठवण

पुणे नगरपालिकेत मुलींच्या शिक्षणाबाबत आणि हौदातील पिण्याचे पाणी दलितांना मिळावा, या मागणीसाठी मांडलेले दोन्ही ठराव नामंजूर करण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील गायकवाड वाडा आणि जेधे मॅन्शन चळवळीची ही दोन्ही केंद्र अंतराने अगदी जवळ-जवळ होती. परंतु या दोन्हीमध्ये वैचारिक अंतर फार मोठे होते. या वैचारिक अंतरामुळेच दिवंगत केशवराव जेधे यांनी तत्कालीन पुणे नगरपालिकेत मुलींच्या शिक्षणाबाबत आणि हौदातील पिण्याचे पाणी दलितांना मिळावा, या मागणीसाठी मांडलेले दोन्ही ठराव नामंजूर करण्यात आले होते, अशी एक आठवण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (ता.९) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितली.

दिवंगत माजी खासदार केशवराव जेधे चरित्र पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘केशवराव जेधे यांनी कायम सामाजिक परिवर्तनासाठी काम केले. यासाठी ते दलित आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असत. त्यानुसार ते जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले. तेव्हा पुणे ही महानगपालिका नव्हती. तेव्हा ती नगरपालिका होती. नगरपालिकेत केशवराव जेधे यांनी पहिला ठराव पुणे शहरातील सर्व घटकांतील मुला-मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा, असा ठराव मांडला होता. त्यांच्या या ठरावाला विरोध करण्यात गायकवाड वाड्यातील वैचारिक किनार होती. त्यातूनच पुणे नगरपालिकेत जेधे यांचा हा ठराव नामंजूर करण्यात आला.’’

जेधे यांनी दुसरा ठराव हा पुणे शहरातील हौदांमधील पिण्याचे पाणी हे दलितांना मिळाले पाहिजे, अशी मागणी करणारा ठराव मांडला होता. दुर्दैवाने याही ठरावाला विरोध करण्यासाठी गायकवाड वाडा आणि जेधे मॅन्शनमधील वैचारिक अंतरच कारणीभूत ठरले. पर्यायाने केवळ वैचारिक अंतरामुळे हे दोन्ही ठराव पुणे नगरपालिकेत मंजूर होऊ शकले नसल्याची खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT