sharad pawar  sakal
पुणे

Sharad Pawar : पुस्तकांच्या सहवासाने आयुष्य बदलते : पवारांनी व्यक्त केले मत

Sharad Pawar : चांगली पुस्तके तुमचे मस्तक नेहमी शाबूत ठेवतात

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar : माझे वाचन आजही सुरू आहे, चांगली पुस्तके तुमचे मस्तक नेहमी शाबूत ठेवतात. पुस्तकांच्या सहवासाने तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळते. जी माणसे वाचतात, ती जनमानसाचा कानोसा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका घेतात. जी माणसे लिहितात त्यांना इतिहासाचे, समाजाचे शिल्पकार म्हटले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुण्यामधील धनकवडी येथील सरहद पब्लिक स्कूलमध्ये लेखक, पत्रकार, संघटक, संदीप काळे यांच्या 'उपेक्षितांचं जगणं' आणि 'उमेदीचा अंकुर' या दोन पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार बोलत होते.

शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्रीराम पवार, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, संतसिंह मोखा, शैलेश पगारिया, यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला.

वाचन करणे, हा चांगल्या संस्काराचा भाग आहे. ज्याला वाचनाची आवड आहे, त्याला आपल्या भोवतालचे सगळे विषय सहजपणे कळतात, हाताळता येतात. वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढवून जनमानसाकडे चांगल्या अर्थाने बघायचा दृष्टिकोन अधिक कसदार बनू लागतो, असेही यावेळी पवार म्हणाले. सुशीलकुमार शिंदे, चंद्रकांत पाटील यांची यावेळी भाषणे झाली.

आपल्या मनोगतमध्ये बोलताना संदीप काळे म्हणाले, 'उपेक्षितांचं जगणं' आणि 'उमेदीचा अंकुर' या दोन्ही पुस्तकांमध्ये अनेक सामाजिक विषयांचा आढावा घेतला आहे. समाजात असणाऱ्या अनेक वाईट परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या अनेक विषयांवर या पुस्तकात भूमिका मांडण्यात आली आहे. आजही समाजामध्ये अनेक वाईट प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्तीला ठेचून काढायचे काम सातत्याने करणारे आपल्या अवतीभवती आहेत. त्याचे वर्णन या पुस्तकांत दिले आहे.

यावेळी बोलताना श्रीराम पवार म्हणाले, संदीप काळे यांचे लिखाण उपेक्षितांच्या दु:खावर फुंकर घालणारे आहे. संदीप यांचे हे ६७ वे पुस्तक आहे. संदीप काळे यांचे लिखाण त्या शेवटच्या घटकावर भाष्य करणारे आहे ज्यांचे कुणीच नाही. संदीप यांच्या लिखाणाच्या माध्यमातून सामाजिक विषय सातत्याने हाताळले जावेत, अशी अशा आहे.

कार्यक्रमासाठी पुण्यातील वाचक, लेखक, प्रकाशक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT