Sharad Pawar shares his memory with Atal Bihari Vajpayee 
पुणे

सरकारच्या विरोधात भाषण केलं अन् रात्री आला वाजपेयींचा फोन....

उमेश घोंगडे

पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कसा जपावा, हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अखंड राजकीय जीवनात त्यांनी संसदेची प्रतिष्ठा कायम जपली या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.

पवार म्हणाले, "मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना "पुलोद'च्या काळात जनता पार्टीच्या रूपाने वाजपेयींचे महाराष्ट्रातील सहकारी आमच्यासोबत होते. त्यावेळी बैठकीनिमित्त मी पहिल्यांदा वाजपेयी यांना भेटलो होतो.'' राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याशी सततचा संपर्क होता. 1996 साली वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार पडले. तेव्हा मी कॉंग्रेसचा संसदीय नेता होते. या नात्याने वाजपेयी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मी केलेले भाषण त्यांनी शांततण ऐकून घेतले. त्यानंतर वाजपेयी यांनी राजीनामा दिला. त्या रात्री त्यांचा मला फोन आला व संसदेत केलेल्या भाषणाबद्दल त्यांनी माझे कौतुक केले. अशाप्रकारे राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक उमदा माणूस मी पाहिला. 

वाजपेयी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्यावतीेने मी त्यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर गेलो होतो. या दौऱ्यात रोजच्या-रोज ते आमच्याशी चर्चा करायचे. प्रत्येक विषयावर आपल्या देशाची भूमिका काय असावी, हे सांगायचे शिवाय त्यावर आमच्या सूचना असतील तर या सूचनांची तातडीने दखल घ्यायचे, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

गुजरातमध्ये 2002 मध्ये भूकंप आला होता. त्यात मोठी हानी झाली होती. भूकंप झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या पुनर्वसनाचा मला अनुभव होता. मी स्वतः वाजपेयी यांनी गुजरातला याबाबत सहकार्य करण्याची तयारी असल्याचे कळवले. त्यानंतर त्यांच्याच सरकारच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली. विरोधी पक्षांच्या चांगल्या सूचनांचाही ते नेहमी आदर करायचे, असा अनुभव पवार यांनी सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT