paw.jpg 
पुणे

शरद पवार यांच्याकडूनही 'त्या' युवकांच्या स्टार्टअपची दखल

सकाळवृत्तसेवा

पुणे ः कोरोनाच्या संकटाची तमा न बाळगता पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा प्रसार आणि प्रचार करीत सुरू केलेल्या वाघोलीतील युवकांच्या स्टार्ट अपची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी घेतली. त्यांना शुभेच्छा देत पवार यांनी आशीर्वादही दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 पुण्यातील वाघोली परिसरातील 20-22 युवकांच्या गटाने वृक्ष गजाजन हा ग्रूप स्थापन केला आहे. शेतातील माती आणि गेरूपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती ते नागरिकांना घरपोच देतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी ही मूर्ती बादलीत टाकली की आपोआप विरघळते, हे त्या मूर्तीचे वैशिष्ट्य. गेल्या वर्षी या युवकांनी सुमारे पाच हजार मूर्तीं शहरात नागरिकांपर्यंत पोचविल्या होत्या तर यंदा त्यांचे उद्दिष्ट सुमारे 15 हजार मूर्तींचे आहे.

या युवकांच्या उपक्रमाची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी युवकांना फोन करून मंगळवारी मुंबईत सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या निवासस्थानी बोलविले. त्यांच्या उपक्रमाबाबत चर्चा केली. त्यावेळी शरद पवार बंगल्यात होते. त्यामुळे सुळे यांनी त्या युवकांची पवार यांच्याबरोबरही भेट घालून दिली आणि त्याचे फेसबुक लाईव्हही केले. पवार यांनीही या उपक्रमाबाबत युवकांकडे सखोल चौकशी करून माहिती घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. युवकांनी एक मूर्तीही पवार यांना भेट दिली. 

या अनुभवाबाबत बोलताना वृक्ष गजाननचे डॉ. अक्षय कौठाळे म्हणाले, पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आमच्या डोक्यात खूप दिवसांपासून होते. त्यासाठी तीन वर्षे आम्ही चाचणी केली. त्यानंतर गेल्या वर्षांपासून यामूर्ती नागरिकांना घरोघरी पोचवू लागलो. आमच्या गटात 20-22 युवक आहोत. आम्हीच सगळे वेगवेगळ्या जबाबदाऱया वाटून घेतल्या आहेत. त्यानुसार मुंबई- पुण्यात मूर्ती पोचवितो. सुप्रियाताईंनी आम्हाला मुंबईला बोलविल्यावर माझ्यासह राहुल दुसाने, विशाल वारडे, दिनेश वाळके आम्ही गेलो. साहेबांनीही आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे आमचा हुरूप वाढला आहे.

या उपक्रमातून सुमारे 35 महिलांना रोजगार मिळतो. सुमारे 1800 ते 2900 रुपये या रेंजमध्ये पाच प्रकारच्या गणेश मूर्ती वृक्ष गजाननकडे उपलब्ध आहेत. पुण्यातील उपनगरांसह काही वितरकांकडेही त्यांनी मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT