sharad-Pawar 
पुणे

शरद पवार म्हणतात, अजित पवारांनी मुलाला सांगितले...(व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत त्यांच्या कुटुंबात चर्चा केली. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले, की बँक गैरव्यवहार प्रकरणात काकांचा (शरद पवार) काहीही संबंध नसताना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे असे राजकारण करण्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 71 जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचे टाळल्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली होती. याविषयी पवार यांनी स्पष्टीकरण दिले.

पवार म्हणाले, की अजित पवार यांनी आज राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याची चर्चा केली नव्हती. अशा परिस्थितीत राजीनामा देण्याची त्यांनी काहीही माहिती दिली नव्हती. सहकारी संस्थेमध्ये काम करत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. आज कुटुंबात त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.



महाराष्ट्र राज्य बँक गैरव्यवहार प्रकरणात काका म्हणजे माझा काहीही संबंध नसताना त्यांचे नाव घेण्यात आले. त्यांच्यामागेही चौकशीचे शुक्लकाष्ट लावण्यात आले. त्यांनी त्यांच्या मुलासोबत याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर संपर्क साधलेला नाही. त्यांचा स्वभाव असाच आहे. त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, की ते कठोर निर्णय घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT