पुणे

शरद पवार माढ्यातून निवडणुक लढणार?

सकाळवृत्तसेवा

पुणे- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. यावर पवार यांनी विचार करणार असल्याचे सांगितल्याने पवार माढ्यातून निवडणूक लढणार? या चर्चेला उधाण आले आहे.

पवार म्हणाले की, माढा मतदारसंघातून मी निवडणुक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांनी धरला असल्यामुळे त्यांच्या आग्रहावर मी विचार करेन, असे मी त्यांना सांगितले आहे. यामुळे सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर शरद पवार माढ्यातून निवडणुक लढवणार का या चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या इच्छुकांची चाचपणी सुरु केली आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पवार यांनी 2009 मध्ये माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवली होती. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती. येथे 2019 च्या लोकसभेसाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, शरद पवार यांच्या आजच्या विधानामुळे ते माढ्यातून निवडणुक लढणार ? या चर्चेला उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT