Sharad Pawar's meeting will be held tomorrow to promote Chetan Tupe in maharashtra vidhansabha 2019.jpg
Sharad Pawar's meeting will be held tomorrow to promote Chetan Tupe in maharashtra vidhansabha 2019.jpg 
पुणे

Vidhan Sabhha 2019 : चेतन तुपेंच्या प्रचारासाठी उद्या पुण्यात शरद पवारांची सभा

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabhha 2019 : हडपसर : हडपसर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सायंकाळी ५ वाजता स्वर्गीय खासदार विठ्ठल तुपे नाटयगृहासमोर सभा होणार आहे. रविवारी खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या रोड 'शो' ला उत्फुर्त प्रतिसाद लाभल्याने तुपे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 


''अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारणाऱ्या शिवरायांचा आदर्श राज्यकर्त्यांनी ठेवायचा असतो, परंतु भाजप सरकारने मात्र बहुजन समाजाच्या तोंडाला कायम पानेच पुसली. संविधानविरोधी, जातीयवादी या सरकारच्या विरोधात संपूर्ण बहुजन समाज एकवटला असून त्यांच्या पाठींब्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात बदल नक्कीच घडून येईल, असा विश्वास हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांनी व्यक्त केला. 

सोमवारी प्रभाग क्रमांक २२, २३ व २४ मध्ये महाआघाडीचा जोरदार प्रचार करण्यात आला. रामटेकडी, वैदूवाडी, १५ नंबर, लक्ष्मी कॉलनी, जुना कॅनॉल, विठ्ठल नगर, डवरीनगर, विशालनगर, अजिंक्य कॉलनी, बनकर कॉलनी, उन्नतीनगर, अमरलता, अमरछाया सोसायटी परिसरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 

''कचरा, वाहतूक कोंडी, अपुरे पाणी या समस्यांना हडपसरवासियांना तोंड द्यावे लागते आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुशिक्षित, हक्काचे आणि परिवर्तनशील, पुरोगामी विचारांचे नेतृत्व. निवडून द्यावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले.यावेळी नगरसेवक आनंद अलकुंटे, नगरसेवक अशोक कांबळे, बंडूतात्या गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर, पूजाताई कोद्रे, फारुख ईनामदार, शिवाजी पवार, दिलीप शंकर तुपे, नीलेश मगर, डॅा. शंतनू जगदाळे, विजय मोरे, संजीवनी जाधव, प्रशांत पवार, विशाल तुपे, लहू कांबळे, विशाल जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, रिपाई जोगेंद्र कवडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT