JUN1 
पुणे

शरद पवार यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम ः बेनके

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : ""जुन्नर विधानसभा उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो माझ्यासाठी अंतिम राहील,'' असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी केले.

जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक नारायणगाव येथे शुक्रवारी (ता. 6) झाली. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी संजय काळे, पांडुरंग पवार, अनिलतात्या मेहेर, शरद लेंडे, अंकुश आमले, बाळासाहेब खिलारी, मोहित ढमाले, भाऊ देवाडे, दीपक औटी, अरुण मोरे, अलका फुलपगार, दिनेश दुबे, सूरज वाजगे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर आदी या वेळी उपस्थित होते.

जुन्नरची जागा "राष्ट्रवादी'लाच मिळावी, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची तालुक्‍यात मोठी ताकद आहे. अतुल बेनके यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, अशी भावना अनेक पदाधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.

संजय काळे म्हणाले, ""तालुका संघटनेने एकमुखाने अतुल बेनके यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. विधानसभेचे आघाडीचे उमेदवार अतुल बेनके हेच असतील, कार्यकर्त्यांनी विचलित होऊ नये.''

या वेळी शरद लेंडे, पांडुरंग पवार, दादाभाऊ बगाड, अनिलतात्या मेहेर, भाऊ कुंभार, तुषार थोरात, संदीप गंभीर, विजय ढामसे, अलका फुलपगार, पूजा बुट्टे आदींची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्तराखंडमधील मदरशांची शुक्रवारची सुट्टी रद्द? आता रविवारची साप्ताहिक सुट्टी लागू करण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅप्टन स्मित मच्छर यांना इस्रायलच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे निमंत्रण

Annamalai News: CJPचे समर्थन, भाजपला खडे सवाल! काय म्हणाले अण्णामलाई?

GURU GOCHAR: ३१ ऑक्टोबरला गुरू ग्रहाचं गोचर; पुढचे ३ महिने ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरू शकतात खास, पैसा आणि करिअरमध्ये मिळतील नव्या संधी?

Muhurat Trading 2026: दिवाळीला शेअर बाजार उघडणार! मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर; BSE-NSE चं संपूर्ण वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT