पुणे

राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

CD

फोटो ः शरण्या पटवर्धन

पुण्याच्या शरण्या पटवर्धनला जेतेपदाचा मान
राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे, ता. ७ ः वर्धा येथे वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अकरा वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पुण्याच्या शरण्या पटवर्धनने पटकाविले.
वर्धा येथील जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या शरण्या पटवर्धनने सुरेख खेळ करताना ठाण्याच्या कियारा लेलेचा ११-४, ११-७, १३-११ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी उपांत्य फेरीच्या लढतीत ठाण्याच्या कियारा लेलेने नाशिकच्या अधीरा आहेरला १२-१०, ७-११, ९-११, ११-६, ११-३ असे, तर पुण्याच्या शरण्या पटवर्धनने ठाण्याच्या रिद्धी सिंगला ११-५, ११-५, ७-११, ११-१३, ११-९ असे पराभूत केले होते. तर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नाशिकच्या अधीरा आहेरने ठाण्याच्या ईशिता भानगडीयावर १२-१०, ११-५, ११-७ असा, ठाण्याच्या कियारा लेलेने नाशिकच्या अनया आहेरवर ११-४, ११-८, ११-४ असा, ठाण्याच्या रिद्धी सिंगने कोल्हापूरच्या आरोही श्रीश्रीमळवर ११-७, ११-५, ११-५ असा, तर पुण्याच्या शरण्या पटवर्धनने ठाण्याच्या धडकन टन्नावर ५-११, ११-९, ११-१३, १२-१०, ११-७ असा विजय मिळविला होता.
विजेती शरण्या पटवर्धन एम. ई. एस. बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशालेत पाचवी इयत्तेत शिकत असून ती मार्तंड बिनीवाले टेबल टेनिस अकादमीत मार्तंड बिनीवालेच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. यंदाच्या मोसमातील राज्य मानांकन स्पर्धेतील तिचे हे पहिलेच जेतेपद आहे.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT