Shasan Aplya Dari Jejuri CM Shinde Devendra Fadnavis and Ajit Pawar visited jejuri gad Khandoba temple  
पुणे

Shasan Aplya Dari Jejuri : मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, अजित पवार जेजुरी गडावर! खंडेरायाचं घेतलं दर्शन

रोहित कणसे

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कर्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या आगोदर शिंदे-फडणवीस आणि पवार या तिघांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन देखील घेतलं.

जेजुरी येथे आज (७ ऑगस्ट) शासन आपल्या दारी या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी या नेत्यांनी खंडोबाचे दर्शन घेतलं. या पूर्वी दोन वेळा जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होत आहे.

या आधी दोन वेळा जेजुरीती या कार्यक्रमाचे नियोजन केले होते, परंतु त्यावेळेस कार्यक्रम झाला नव्हता, त्यामुळे आता आज होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी चोख करण्यात आली आहे. या कार्यक्रम प्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळाला भेट दिली होती. या ठिकाणी विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी दालने देखील उभारण्यात आली आहेत.

राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ हा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळवा यासाठी हा 'शासन आपल्या दारी' उपक्रम राबवण्यात येतो. विद्यमान राज्य सरकारकडून राज्यातील अनेक शहरात यापूर्वी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रमानिमीत्त कार्यक्रम घेतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT