पुणे

शताब्दीचे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

CD

पुणे, ता. १४ : मध्य रेल्वेची प्रतिष्ठित पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस सध्या एकाच ‘रेक’च्या (डब्यांचा संच) मर्यादेमुळे सातत्याने विलंबाने धावत आहे. देखभालीसाठी मिळणारा अपुरा वेळ आणि प्रवाशांच्या चढ-उताराची कसरत यामुळे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवाशांना स्थानकावर चार ते सहा तास ताटकळत राहावे लागत आहे.
पुणे आणि सिकंदराबाद या औद्योगिक शहरांना जोडणाऱ्या गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, रेल्वे प्रशासनाने या गाडीसाठी केवळ एकाच रेकची व्यवस्था केली आहे. वेळापत्रकानुसार, या गाडीला ‘ले-ओव्हर’साठी (पुढील प्रवासाला निघण्यापूर्वी मिळणारा वेळ) केवळ सहा तास ५० मिनिटांचा वेळ मिळतो. नियमांनुसार, यातील सहा तास तांत्रिक देखभाल, स्वच्छता आणि दुरुस्तीसाठी अनिवार्य असतात. उर्वरित अवघ्या ५० मिनिटांत गाडी यार्डातून फलाटावर आणणे, प्रवाशांना उतरवणे आणि नव्या प्रवाशांचे बोर्डिंग करणे ही प्रक्रिया पार पाडावी लागते.

...अन् गाडीला उशीर होतो
प्रवासादरम्यान गाडीला थोडा जरी उशीर झाला, तरी देखभालीचा वेळ कमी करता येत नसल्याने परतीच्या प्रवासासाठी गाडी उशिराच फलाटावर येते. मंगळवारी सेवा नसल्याने बुधवारपासून गाडी वेळेवर धावते, मात्र पुन्हा उशीर झाल्यास हे चक्र पुढच्या मंगळवारपर्यंत सुरू राहते.

‘‘काही तांत्रिक कारणामुळे शताब्दी एक्स्प्रेसला उशीर झाला. मात्र, आता शताब्दी एक्स्प्रेस आपल्या वेळापत्रकानुसार धावत आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडणार नाही याची काळजी घेतली जात आहे.’’
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे

‘‘रेल्वेला कोणत्याही कारणाने उशीर झाल्यास त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसतो. गाडी वेळेवर सुटेल या आशेने प्रवासी स्थानकावर येतात, मात्र त्यांना तब्बल चार ते सहा तास ताटकळत बसावे लागते. शताब्दीसारख्या प्रीमियम गाडीसाठी जादा तिकीट मोजूनही उशीर होत असेल तर हे चुकीचे आहे.’’
- कनिष्क बोकेफोडे, रेल्वे अभ्यासक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT