Shaurya recorded India Book Record brilliant sakal
पुणे

Pune : अवघ्या दोन वर्षांच्या शौर्यची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद!

अवघ्या दोन वर्षांच्या मुलाने चमकदार कामगिरी करत केले बुद्धिमत्तेचे प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बालपण म्हणलं की गाड्या, खेळणी यातचरमणारी मुलं, अशा वातावरणात सर्वजण मोठे होतात. मात्र, या बालवयातच आपल्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करत शौर्य कांबळे या अवघ्या दोन वर्षांच्या मुलाने चमकदार कामगिरी केली आहे.

लॉकडाउनमध्ये जन्माला आलेल्या शौर्यची कामगिरी सुद्धा सांगण्याजोगी आहे. ज्या वयात मुले खेळण्यांमध्ये मग्न असतात, इतकंच नव्हे तर काहींना नीट बोलताही येत नाही, त्याच वयात त्याने आपल्या बुद्धिमत्तेचे प्रदर्शन केले आहे.

त्याने पाच राष्ट्रीय चिन्हे, दोन कविता, इंग्रजीची मुळाक्षरे, सात पक्षी, विविध गाड्या, मानवी शरीरातील विविध अंग, अवयव, फळे, भाज्या, रंग, हावभाव आदी गोष्टी बरोबर ओळखून त्या म्हणून दाखविल्या आहेत. यासाठी त्याच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नुकतीच करण्यात आली आहे.

शौर्यचे वडील खासगी कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर असून, आई सोनम खासगी कंपनीमध्ये प्रक्रियातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मात्र, तरीही या लहान वयात त्याला आवश्‍यक शिक्षणाचे धडे देण्यात त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. याबाबत शौर्यचे बाबा मेघन कांबळे सांगतात, ‘‘त्याचा जन्म झाला तेव्हा लॉकडाउन होते. त्यामुळे त्‍याला घराबाहेर घेऊन जाणे शक्य नव्हते.

अशात घरीच त्याला चित्रे दाखवून गोष्टींची ओळख करून देण्यास आम्ही सुरुवात केली. त्या गोष्टी पटकन समजतात आणि तो ते लक्षातही ठेवू शकतो, हे आम्हालादेखील हळूहळू समजू लागले. त्याच्या या बौद्धिक क्षमतेला एक योग्य व्यासपीठ मिळावे म्हणून विविध पर्याय पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’बाबत समजले व त्याचे नाव यासाठी देण्याचे निश्चित केले.’’

पालकत्व हा अतिशय नाजूक पण तितकाच जिव्हाळ्याचा विषय. मोबाईल ही आजकाल गरज नसून, व्यसन होत चालले आहे असं म्हणत असताना लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे कठीण आहे. डिजिटल लर्निंगच्या काळात मोबाईल हे शिक्षणाचे नवे माध्यमदेखील आहे.

त्यामुळे माध्यमाचा योग्यरित्या वापर करून चांगल्या गोष्टी शिकवता येऊ शकतात, हेच आम्ही शौर्यच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एकत्र कुटुंबपद्धती हा पालकत्वातील अजून एक महत्त्वाचा विषय आहे. लहान मुलांशी आपण जितका संवाद साधू तितकेच ते अधिक शिकतात. - सोनम कांबळे, शौर्यची आईं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT